देशातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर VIने अल्टिमेट एंटरटेनमेंट ऍप, वी मुव्हीज अँड टीव्ही आज सादर केले. वी चे प्रीपेड ग्राहक फक्त २०२ रुपयांमध्ये तर पोस्टपेड ग्राहक १९९ रुपयांमध्ये टीव्ही, मोबाईल किंवा वेबवर पाहण्यासाठी कोणत्याही डिव्हाईसवर वी मुव्हीज आणि टीव्ही बघू शकतील.
बघता येतील हे लोकप्रिय प्रोग्राम्स
केवळ एक सबस्क्रिप्शन घेऊन अनेक प्लॅटफॉर्म्स युजर्सला अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स वापरता येतील. यामुळे ग्राहकांचे घसघशीत पैसे वाचणार आहेत. डिस्ने+ हॉटस्टारवर द शोटाइम, कर्मा कॉलिंग, लूटेरे, सेव्ह द टायगर २ यासारखे लोकप्रिय शो असोत किंवा ट्वेलथ फेल, सलार (हिंदी), पटना शुक्ला यासारख्या ब्लॉकबस्टर मुव्हीज असोत, सोनीलिववरील द शार्क टॅन्क इंडिया, स्कॅम २०२३, द तेलगी स्टोरी, रायसिंघानी वर्सेस रायसिंघानी असो किंवा फॅन कोडमधील एफ१/लाईव्ह क्रिकेटचा थरार असो, वी मुव्हीज अँड टीव्हीवर हे सर्व पाहता येईल. याशिवाय डिस्कव्हरी, आज तक, रिपब्लिक भारत, एबीपी, इंडिया टुडे यासारखी ४०० पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स देखील यावर पाहता येतील. इतकेच नव्हे तर, वी युजर्सना भेट म्हणून शेमारू आणि हंगामा कन्टेन्ट लायब्ररीजचा देखील ऍक्सेस दिला जाईल.
भारतातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध
भारतातील विविधता डोळ्यासमोर ठेवून वी मुव्हीज अँड टीव्ही ऍप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या ऍपवर बातम्या, भक्तिमय कार्यक्रम, ड्रामा, विनोदी, वैज्ञानिक असे विविध शैलींच्या कार्यक्रमांबरोबरीनेच हिंदी, इंग्रजी, मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळम, पंजाबी, बांगला, कन्नड आणि इतर अनेक वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील कार्यक्रम देखील पाहता येणार आहेत.