मायक्रोसॉफ्ट विकणार सेफ्टी अपडेट्स
मायक्रोसॉफ्ट आता Windows 10 साठी विशेष सुरक्षा अपडेट्स विकेल, ज्याला ” “एक्सटेंडेड सिक्योरिटी अपडेट्स” (ESU) म्हणतात. विंडोज 10 वापरण्यासाठी युजर्सना आता कंपनीची वार्षिक योजना खरेदी करावी लागेल. हा प्लॅन पहिल्या वर्षासाठी 5,000 रुपयांच्या सुरवातीच्या किंमतीपासून सुरू होईल.
या अपडेट्सची किंमत किती असेल?
Windows 10 वापरण्यासाठी, युजरला पहिल्या वर्षासाठी सुमारे 5,000 रुपये द्यावे लागतील. दुसऱ्या वर्षी, तुम्हाला दुप्पट म्हणजे सुमारे 10,000 रुपये द्यावे लागतील. तिसऱ्या वर्षी ही किंमत पुन्हा दुप्पट होईल आणि युजरला सुमारे 20,000 रुपये द्यावे लागतील. विंडोज 10 वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला या योजना खरेदी कराव्या लागतील. आतापर्यंत हे अपडेट्स जुन्या विंडोज वापरणाऱ्या मोठ्या कंपन्यांनाच मिळत होते. पण आता सर्वांना ते विकत घ्यावे लागणार आहेत.
काहींना मिळेल डिस्काउंट
तुम्ही Microsoft च्या क्लाउड सोल्यूशन्स (जसे की Intune किंवा Windows Autopatch) वापरत असल्यास तुम्हाला 25% सूट मिळेल.यासोबतच शाळांनाही डिस्काउंट मिळणार आहे. त्यांना पहिल्या वर्षी फक्त 1 रुपये द्यावे लागतील.
का बदल करतेय मायक्रोसॉफ्ट ?
लोकांनी Windows 11 वर अपग्रेड करावे अशी मायक्रोसॉफ्टची इच्छा आहे. परंतु बरेच संगणक Windows 11 साठी आवश्यक फीचर्स पूर्ण करत नाहीत. Statcounter डेटानुसार, सध्या बाजारात 69% लोक Windows 10 वापरत आहेत तर फक्त 27% लोक Windows 11 वापरत आहेत. हे अंतर येत्या 18 महिन्यांत कमी होणार नाही आणि अनेक लोकांना हे सशुल्क अपडेट्स घेणे भाग पडण्याची शक्यता आहे.