दुसऱ्या आठवड्यातही बजेटच्या आकड्यांपासून दूर आहे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा, एकूण कमाई किती?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याच्या या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची सध्या चर्चा आहे. दोन आठवड्यांपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात काहीसा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर सिनेमाच्या टीमनं जोरदार प्रमोशन केल्याचं पाहायला मिळालं. अनेक सेलिब्रिटींकडून प्रमोशन, वेगवेगळ्या ऑफर्स यामुळं सिनेमाची कमाई वाढल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या आठवड्यात सिनेमानं सहा कोटींची कमाई केली आहे.
कलाच्या हाती मोठा पुरावा, राहुलचा होणार पर्दाफाश; ऐन साखरपुड्यात नयना गरोदर असल्याचे सत्य समोर

प्रदर्शित झाला त्या दिवशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमानं १.०५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटानं २.२५ कोटींचा गल्ला जमवला होता.प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या रविवारी या चित्रपटानं २.६० कोटींची कमाई केली होत, तर पाचव्या दिवशी सिनेमाची कमाई घसरल्याचं पाहायला मिळाल होतं. पाचव्या दिवशी सिनेमानं १.१० कोटींचा गल्ला जमवला होता. दोन आठवड्यात या सिनेमानं १७. ६९ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला बजेटचा आकडाही अद्याप पार करता आला नाहीये

सिनेमाचं बजेट किती?

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश राहार यांनी केली असून रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. या सिनेमाचं बजेट हे २० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळं सिनेमाच्या बजेटचा आकडा पार करण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
अवॉर्ड शोमध्ये डान्स करण्यासाठी नकार दिला म्हणून एक-दोन वर्षं त्यांनी… गौरी नलावडेचा खुलासा

द केरला स्टोरी, द काश्मीर फाइल्स तसंच आर्टिकल ३७० या सिनेमांच्या तुलनेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाची कमाई फारच कमी असल्याचं पाहायला मिळतंय. सिनेमाचं , कलाकारांचं कौतुक होत असलं तरी बॉक्स ऑफिसवर कमाई होताना मात्र दिसत नाहीये.

मोदी, गडकरी, गोडसेवरील सिनेमा फ्लॉप झाला, फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा; नानांचा सल्ला

सिनेमाचं दिग्दर्शन हे खुद्द रणदीप हुड्डा यानं केलं आहे. या सिनेमासाठी तो गेली तीन वर्षे मेहनत घेत होता. यासाठी त्यानं त्याच्या वडिलांची काही प्रॉपर्टी विकल्याचंही रणदीपनं सांगितलं. तसंच सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनं सावरकर यांच्या पत्नीची अर्थात यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे.

सिनेमा टॅक्स फ्री करा… मनसेची मागणी
दरम्यान, मनसे नेते व प्रसिद्ध चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी हा सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली आहे.

Source link

Ranveer Hoodaswatantra veer savarkar box office collectionswatantra veer savarkar movieswatantra veer savarkar movie budgetSwatantraVeer Savarkar Box Office CollectionSwatantryaveer Savarkarअंकिता लोखंडेरणवीर हुड्डास्वातंत्र्यवीर सावरकर
Comments (0)
Add Comment