स्कॅमर्सचा नवीन नंबरी घोटाळा! ATMमधून पैसे काढत असाल घ्या ही काळजी, एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान

ATM सबंधित आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. याप्रकारे फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. यात घोटाळेबाज ATMच्या अवतीभोवती बनावट कस्टमर केअर नंबर लिहितात. ग्राहकांचे कार्ड मशीनमध्ये अडकल्यास यापुढे घोटाळेबाजांचे काम सुरु होते. अलीकडेच अशा पद्धतीने फसवणूक करुन एका पीडितेचे हजारो रुपये लाटण्यात आले आहे.

घोटाळेबाज लोकांना अडकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरतात. असेच काहीसे नुकतेच एका महिलेसोबत घडले, जी घोटाळेबाजांच्या या जाळ्यात अडकली. प्रकरण या महिन्याच्या सुरुवातीचे आहे. पीडित महिला दिल्लीतील मयूर विहार भागातील रहिवासी आहे. पीडित महिला एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांचे कार्ड एटीएममध्ये अडकले. यानंतर पीडितेने हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला असता तिची फसवणूक झाली. नेमकं काय आहे प्रकरण ही फसवणूक कशी झाली जाणून घ्या

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना या महिन्याच्या सुरुवातीला घडली होती. पीडित महिला एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली होती, मात्र तिचे कार्ड एटीएममध्ये अडकले. त्या एटीएममध्ये गार्ड नसल्याने. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या माहितीत पीडितेने सांगितले की, तिला एटीएमच्या भिंतीवर एक नंबर मिळाला.

एटीएमबाहेर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हा एजंटचा संपर्क क्रमांक असल्याचे सांगितले. यानंतर, पीडितेने तो नंबर डायल केला, त्यानंतर बनावट एजंटने तिला एटीएम ब्लॉक करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून ती तिचे कार्ड काढू शकेल. यासाठी स्कॅमरने त्यांना काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगितले.
मात्र, बनावट एजंटने दिलेल्या स्टेप्सचा अवलंब करूनही पीडितेचे एटीएम कार्ड बाहेर आले नाही. बनावट एजंटने तिला आश्वासन दिले की दुसऱ्या दिवशी टेक्निकल टीम एटीएममधून कार्ड काढून तिला परत करतील. मात्र यानंतर पीडीतेला धक्का बसला तिच्या बँक खात्यातून सर्व पैसे काढण्यात आले व तिची फसवणूक झाल्याचे तिला लक्षात आले.

तुम्हाला यापासून कसा बचाव करता येईल?

या प्रकारच्या फसवणूकीपासून वाचण्यासाठी व एटीएम मशिनमध्ये अनेक वेळा कार्ड अडकत असल्याने
तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

  • भिंतीवर लिहिलेल्या आकड्यांवर कधीही विश्वास ठेवू नये. एटीएम मशिनमध्ये तुमचे कार्ड अडकले तर तुम्ही थेट तुमच्या बँकेशी संपर्क साधावा. यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून नंबर मिळवू शकता.
  • तुमचा एटीएम कार्ड पिन कोणाशीही शेअर करू नका.
  • जर कोणी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायला सांगत असेल तर विचार न करता त्या फॉलो करू नका. * तुमची कोणतीही फसवणूक झाली तर लगेच तुमच्या बँकेला कळवा.
  • एटीएम फसवणुकीविरोधात पोलिसांत तक्रार करा.

Source link

atm fraudcustomer care numberDebit Cardhelp hotlinescamएटीएम फसवणूक
Comments (0)
Add Comment