चंद्राला मिळेल स्वतंत्र टाईम झोन
मीडिया रिपोर्ट्समध्ये व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीच्या माध्यमातून म्हटले आहे की प्रस्तावित कोऑर्डिनेटेड लूनर टाइम (LTC) चा उद्देश अंतराळ मोहिमांना मदत करणे आणि कार्यक्षमता वाढवणे आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी व्हाईट हाऊसने नासाला २०२६ ची मुदत दिली आहे. व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीच्या संचालक आरती प्रभाकर म्हणतात की वैज्ञानिक शोध, आर्थिक विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एक स्वतंत्र टाइम झोन आवश्यक आहे.
गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे वेळेत फरक
पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी आहे. यामुळे, तेथील वेळ सुमारे ५८.७ मायक्रोसेकंदांनी वाढते. व्हाईट हाऊसने असेही म्हटले आहे की भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये सुरक्षित नेव्हिगेशन सुनिश्चित करण्यासाठी, चंद्राच्या कक्षेतील वेळ निर्धारित करणे आवश्यक आहे. त्यामुळे नासावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या वर्षी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ मिशन लँड करून इतिहास रचला, अमेरिका, रशिया आणि चीन हे चंद्रावर मोहिमा पाठवणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहेत. आगामी काळात अनेक देशांचे चंद्रावर मोहीम पाठवण्याचे नियोजन आहे. अशा परिस्थितीत, समन्वयित चंद्र वेळ (LTC) अस्तित्वात असल्याने अंतराळ मोहिमांना मदत होईल.
चंद्र टाइम झोन तयार करण्यात अडचण कुठे आहे?
चंद्रावरील प्रत्येक प्रदेशात घड्याळाचा वेग वेगळा असतो. याचा सरळ अर्थ असा आहे की चंद्र आणि त्याच्या कक्षेत घड्याळ एकाच वेगाने धावणार नाही. बर्नहार्ड ह्यूफेनबॅच, जे ईएसएच्या मानव आणि रोबोटिक अन्वेषण संचालनालयात काम करतात, म्हणाले की युनिव्हर्सल मान्यता असणारे टाईम झोन अंतराळवीरांसाठी देखील लागू होणार आहे. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर २९.५ दिवस जास्त असतात. त्यात केवळ शिट तापमान असलेल्या चंद्राच्या पंधरवड्याच्या रात्रीचाही समावेश आहे. ते म्हणाले की चंद्रासाठी टाईम झोन निश्चित केल्यानंतर, आपण इतर ग्रहांसाठी देखील हे करू शकतो