जगभरात सर्वांना निरोगी आयुष्य जगायचे आहे आणि त्यासाठी आपल्या शरीराबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणे आवश्यक आहे. काही आघाडीच्या टेक कंपन्यांनी याकडे लक्ष देत ही संधी साधली आहे. कारण विविध मेडिकल टेस्ट्ससाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते. यामुळे स्वस्त पर्याय म्हणून अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
Apple Watchमुळे वाचले अनेकांचे प्राण
आपण अनेकदा पाहिले आहे की ऍपल वॉच वापरकर्त्याच्या शरीरात होणारे बदल ट्रॅक करते आणि ग्राहकांना ताबडतोब तशा सूचना देते. मात्र जेव्हा ग्राहक डॉक्टरकडे जातात तेव्हा त्यांना या त्रासाचे कारण कळते. कारण, हे डिवाईस निदान करू शकत नाही.
हे ॲप करेल आजाराचे निदान
यूजरला होणाऱ्या त्रासाचे निदान करण्यासाठी कंपनीने नवीन डिवाईस आणले आहे. या कंपनीचे नाव कार्डिओसिग्नल हे आहे. या स्टार्टअपने एक ॲप तयार केले आहे जे तुमच्या फोनचा वापर करून हृदयाशी संबंधित समस्या ओळखू शकते. व्यवसायाने कार्डिओलॉजिस्ट असलेले कंपनीचे सीईओ जुसो ब्लॉमस्टर यांनी सांगितले की, हा स्टार्टअप 2011 मध्ये सुरू झाला होता.
त्यावेळी Fitbit सारखी उत्पादने बाजारात आली होती, जी मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत होती. त्यांनी सांगितले की त्यावेळी एक रुग्ण त्यांच्याकडे आला होता, ज्याला हे जाणून घ्यायचे होते की तो स्पोर्ट वॉचद्वारे त्याच्या हृदयाचे आरोग्य तपासू शकेल का. यानंतर त्यांनी विविध सेन्सर्सवर काम सुरू केले.
असे करते काम
CardioSignal हे एक ॲप आहे जे तुम्ही सहज तुमच्या फोनवर इंस्टॉल करू शकता. यानंतर तुम्हाला तुमचा फोन छातीवर ठेवावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलमधील सेन्सर हे हृदयाचे ठोके तपासेल यानंतर हे ॲप एक रिपोर्ट तयार करेल व यूजरला याविषयी माहिती देईल. हे क्लिनिकल वापरासाठी मंजूर केले आहे. हे सीई क्लास IIa वैद्यकीय उपकरणाच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. हे ॲप अनेक प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे. ते भारतातही वापरता येणार आहे