Google Pixel 8a चे लीक स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 8a मध्ये ६.१ इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल, अशी माहिती टिपस्टर योगेश ब्रारनं दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं बनवलेला Tensor G3 चिपसेट दिला जाऊ शकतो. याच प्रोसेसरचा वापर गुगलनं आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज पिक्सल ८ मध्ये देखील केला होता. हा फोन १२८जीबी आणि २५६जीबी स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. ऑपरेटिंग सिस्टम पाहता आगामी पिक्सलमध्ये अँड्रॉइड १४ ओएस मिळू शकतो.
Pixel 8a मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात ओआयएस सपोर्ट असलेला ६४एमपीचा प्रायमरी कॅमेरा असेल, त्याचबरोबर १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. असाच कॅमेरा सेटअप गेल्यावर्षी आलेल्या पिक्सल ७ए मध्ये देखील मिळाला होता. स्मार्टफोनमध्ये ४,५०० एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते, जी २७ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
कधी येणार Pixel 8a
टिपस्टरनुसार, पिक्सल ८ए यंदा मे महिन्यात लाँच होऊ शकतो, म्हणजे १४ मेला होणाऱ्या Google I/O 2024 इव्हेंटच्या माध्यमातून हा डिवाइस येण्याची शक्यता जास्त आहे. हा स्मार्टफोन ५०० ते ५५० डॉलर्सच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. ही किंमत ४१,६३५ भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. किंमत प्रत्येक देशात वेगळी असू शकते.
नव्याने समोर आलेली माहिती याआधी देखील समोर आली होती. त्यामुळे पिक्सल ७ए आणि या फोनमध्ये जास्त फरक दिसत नाही. Pixel 8a च्या डिस्प्लेमध्ये १४००नीट्स पीक ब्राईटनेस आणि एचडीआर सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. तसेच चिपसेट सोबत Mali-G715 GPU ची जोड मिळू शकते. डिजाइनच्या बाबतीत देखील जास्त मोठे बदल दिसणार नाहीत यात Pixel 8 सीरिज प्रमाणे वायजर कॅमेरा स्ट्रीप आणि कर्व्ह एज मिळू शकतात.