युनिक मोबाईल नंबरसाठी तब्बल 7 कोटींची बोली; दुबईत झाला अनोखा लिलाव

अनेक लोकांना आपला मोबाईल नंबर, गाडीचा नंबर हा आकर्षक व युनिक असावा असे वाटत असते. त्यासाठी बरेच जण हवी ती किंमत मोजायला तयार असतात. त्यातही श्रीमंत लोकांसाठी छंद ही मोठी गोष्ट आहे. त्याचे ताजे उदाहरण नुकतेच दुबईत पाहायला मिळाले. इथे झालेल्या एका लिलावात एक युनिक मोबाईल नंबर तब्बल 7.25 कोटी रुपयांना विकला गेला. या विक्रीमुल्याबद्दल सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सात वेळा ‘7’

दुबईत ‘द मोस्ट नोबल नंबर्स’ च्या धर्मादाय लिलावात, एका युनिक नंबरसाठी एक आश्चर्यकारक बोली प्राप्त झाली. या युनिक संख्येमध्ये सात वेळा ‘7’ आहे. हा फॅन्सी नंबर ‘058-7777777’आहे. खलीज टाईम्सच्या म्हणण्यानुसार, या नंबरसाठी जोरदार बोली लावली गेली आणि ती AED 3,200,000 (सुमारे 7.25 कोटी रुपये) मध्ये विकली गेली.

‘Dh1 बिलियन मदर्स एंडॉवमेंट’

UAE चे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी सुरू केलेल्या ‘Dh1 बिलियन मदर्स एंडॉवमेंट’ मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी एकूण 10 फॅन्सी कार नंबर प्लेट्स आणि 21 विशेष मोबाइल नंबरचा लिलाव करण्यात आला. यामध्ये 7 सिरीजच्या विशेष क्रमांकावर बोली लावणाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली.

22 लाख रुपयांपासून बोली झाली सुरु

खलीज टाईम्सच्या मते, या युनिक नंबरसाठी AED 100,000 (अंदाजे 22 लाख रुपये) पासून बोली सुरू झाली आणि काही सेकंदातच त्यात लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे 7 क्रमांकासह इतर क्रमांकांवरही बोली लावणाऱ्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. आणखी एक अनोखा क्रमांक ‘054-5555555’ देखील लिलावात AED 2.875 दशलक्ष किमतीला विकत घेण्यात आला.

65 कोटी रुपयांच्या कार नंबर प्लेट्सची विक्री

या लिलावात एकूण AED 38.095 दशलक्ष (अंदाजे 86 कोटी रुपये) पेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यामध्ये कार नंबर प्लेटची विक्री AED 29 मिलियन (सुमारे 65 कोटी रुपये) मध्ये झाली. याशिवाय, ‘Etisalat and du’ या दूरसंचार कंपन्यांच्या विशेष क्रमांकांकडून अनुक्रमे AED 4.135 दशलक्ष (अंदाजे 9 कोटी रुपये) आणि AED 4.935 दशलक्ष (अंदाजे 11 कोटी रुपये) प्राप्त झाले. गेल्या वर्षी या लिलावात प्लेट ‘P7’ 55 मिलियन AED (सुमारे 124 कोटी रुपये) मध्ये विकली गेली होती. त्यावेळी दुबई नंबर प्लेटचा लिलाव चर्चेत आला होता

Source link

biddubaiunique mobile numberदुबईमोबाईल नंबरलिलाव
Comments (0)
Add Comment