पूर्वाभाद्रपद नक्षत्र दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्र प्रारंभ. ब्रह्म योग रात्री १० वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पाद करण प्रारंभ, चंद्र सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२९
- सूर्यास्त: सायं. ६-५३
- चंद्रोदय: पहाटे ५-१९
- चंद्रास्त: सायं. ५-३५
- पूर्ण भरती: सकाळी १०-५५ पाण्याची उंची ४.३० मीटर, रात्री ११-१४ पाण्याची उंची ४.६३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४२ पाण्याची उंची ०.८७ मीटर, सायं. ४-५० पाण्याची उंची ०.७६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३३ मिनिटे ते ५ वाजून १९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ९ वाजून १३ मिनिटे ते १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत. दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून १ मिनिट ते ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. भद्रा काळ संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपासून ते ५ वाजून ७ मिनिटांपर्यंत. पंचक काळ पुर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय – आदित्य हृदय स्तोत्राचे दोनवेळा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)