सूर्यग्रहणाचे फोटोज काढणे पडू शकते महागात! नासाने दिला इशारा, जाणून घ्या

तुम्हीही सूर्यग्रहणाचे फोटोज काढण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका, कारण असे करणे फोटो कॅमेऱ्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमचा मोबाईल कॅमेरा खराब होऊ शकतो. नासाने लोकांना सूर्यग्रहणाचे थेट फोटो काढण्यासाठी स्मार्टफोन कॅमेऱ्याचा वापर करू नये, असा इशारा दिला आहे.

८ एप्रिल रोजी सूर्यग्रहण असेल, परंतु ते केवळ काही देशांमध्येच दिसणार आहे . हे भारत आणि आशियामध्ये दिसणार नाही. सूर्यग्रहणाचे फोटो काढण्यासाठी अनेक लोक त्यांच्या स्मार्टफोन कॅमेऱ्याचा वापर करतात. तुम्हीही असे करण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका, कारण असे करणे फोटोज काढणे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमचा मोबाईल कॅमेरा खराब होऊ शकतो. नासाने लोकांना सूर्यग्रहणाचे थेट फोटो काढण्यासाठी स्मार्टफोन कॅमेऱ्याचा वापर करू नये, असा इशारा दिला आहे. ट्विटरवर विचारण्यात आले असतानासाने सांगितले की, यावेळी सूर्याला थेट कॅमेऱ्यात कैद केल्याने स्मार्टफोनचा सेन्सर खराब होऊ शकतो.

लेन्सचा वापर ठरेल धोकादायक

NASAने सांगितल्यानुसार तुम्ही लेन्सचा वापर करून हे फोटोज काढण्याचा विचार करत असाल तर हा धोका आणखी वाढणार आहे. ग्रहणाची छायाचित्रे काढण्यासाठी तुमच्याकडे कॅमेऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष फिल्टरची आवश्यकता असेल. जर तुम्हाला तुमच्या फोनवरून फोटो काढायचा असेल, तर ग्रहणाचे छायाचित्र काढताना तुमच्या फोनच्या लेन्ससमोर गखास ग्रहण पाहण्यासाठी असलेल्या ग्लासेसचा वापर हा उत्तम मार्ग असणार आहे. तसेच, तुमच्या स्मार्टफोनला नुकसान न पोहोचवता तुम्ही ग्रहणाचे फोटो कसे टिपू शकता हेही NASAने सांगितले आहे.

NASAने सांगितली योग्य पद्धत

  • सर्वप्रथम तुमचे डोळे आणि कॅमेरा यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. सूर्यग्रहण दरम्यान तुमचा स्मार्टफोन कॅमेरा सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष फिल्टर वापरा.
  • चांगल्या फोटोसाठी महागड्या कॅमेऱ्याची गरज नाही, फोटोग्राफीचे कौशल्य जास्त महत्त्वाचे आहे. चित्रे अस्पष्ट होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी, कॅमेरा स्टँडवर ठेवा आणि टायमर वापरा.
  • ग्रहणाच्या दिवसाआधी, तुमच्या स्मार्टफोन कॅमेऱ्याने फोटो क्लिक करण्याचा सराव करा. प्रकाशानुसार कॅमेरा सेटिंग्ज समायोजित करा. तुम्ही वेगवेगळे शटर स्पीड आणि छिद्र वापरून पाहू शकता.

Source link

photography skillssmartphone camerasolar eclipseफोटोग्राफी कौशल्यस्मार्टफोन कॅमेरा
Comments (0)
Add Comment