सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान महादेवाची पूजा केली जाते. तसेच सोमवती अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी उपाय केले जातात. मान्यता अशी आहे की तुम्ही जर सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना शांत करण्याचे उपाय केले तर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमची जीवनात प्रगती होते.
सोमवती अमावस्या ८ एप्रिलला सकाळी ३ वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी संपेल. तर जाणून घेऊया पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता.
- जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका. एखाद्या असहाय जीवाला त्राल दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो. विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा, कुत्रा, गाय, म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका. अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्याच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था आवश्य करा. यामुळे पितर प्रसन्न होतील.
- सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान आवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहाते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता.
- सोमवती अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा आवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुले आवश्य अपर्ण करावीत.
- सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान आवश्यक करा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल.
- हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान आवश्यक करावे. त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील.