कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता
boAt युजर्सच्या या डेटा लीकमुळे, युजर्सवर चोरी, आर्थिक फसवणूक आणि फिशिंग यांसारखे हल्ले होण्याची दाट शक्यता आहे . चोरलेल्या डेटाच्या आधारे हॅकर्स बँक खात्यात प्रवेश करून, युजर्सची आर्थिक फसवणूक करू शकतात. यावेळी सायबर सिक्युरिटी याविषयावरील संशोधक सोमय श्रीवास्तव म्हणाले की, या डेटा लीकमुळे boAt कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
एनरिचचे सीनियर थ्रेट ऐनालिस्ट, राकेश कृष्णन यांनी सांगितल्यानुसार डार्क वेबवर अपलोड करण्यापूर्वी हॅकर्सनी या डेटावर ऍक्सेस मिळवला असेल. त्यांचे यावर असे मत आहे की लीकचा उद्देश हा आहे की हॅकरला सायबर क्राईम कम्युनिटीत एक ओळख निर्माण करायची आहे कारण लीकरचे प्रोफाइल नवीन आहे आणि हे लीक फक्त त्याच्या नावावर आहे.
टेलिग्रामवर डेटा मोफत उपलब्ध
सिक्युरिटी ब्रिगेडचे संस्थापक यश कडाकी यांच्या मते, हा डेटा 2 युरोमध्ये खरेदी करता येईल ते पुढे म्हणाले की काही दिवसात हा डेटा टेलिग्रामवर मोफत उपलब्ध होईल आणि अनेक स्कॅमर हा डेटा वेगवेगळ्या प्रकारच्या फोन आणि ईमेल स्कॅमसाठी वापरण्याची शक्यता आहे. boAt कंपनीने मात्र या डेटा लिकवर अद्याप कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही.