Samsung Galaxy M15 5G ची किंमत
सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M15 5G दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आला आहे.डिवाइसच्या ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त १३,२९९ रुपये ठेवण्यात आली आहे. मोबाइलचा ६जीबी रॅम व १२८जीबी ऑप्शन १४,७९९ रुपयांमध्ये मिळेल. कलर ऑप्शन पाहता स्मार्टफोन ब्लू टोपाज, सेलीस्टियल ब्लू आणि स्टोन ग्रे सारखे तीन ऑप्शनमध्ये सादर झाला आहे.
डिवाइस युजर्स सॅमसंगच्या वेबसाइट, अॅमेझॉन प्लॅटफॉर्म आणि अन्य रिटेल आउटलेट्सवरून विकत घेऊ शकतील. लाँच ऑफर पाहता कंपनी एचडीएफसी बँक कार्डच्या मदतीनं १,००० रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देत आहे. त्याचबरोबर फोनवर ३ किंवा ६ महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन पण आहे.
Samsung Galaxy M15 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M15 5G मध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर १९.५ :९ आस्पेक्ट रेश्यो, १०८० x२३४० पिक्सल रिजॉल्यूशन, ३९९ पीपीआय पिक्सल डेंसिटी, १६ मिलियन कलर्स आणि ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. मोबाइलमध्ये कंपनीनं मीडियाटेक डायमेन्सिटी ६१०० प्लस चिपसेटचा वापर केला आहे. हा 5G टेक्नॉलॉजीसह गेमिंग किंवा इतर ऑपरेशनमध्ये शानदार परफॉर्म करतो.डिवाइस दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यात ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज आणि ६जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
कॅमेरा फीचर्स पाहता Samsung galaxy M15 5G ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
Samsung Galaxy M15 5G फोनची सर्वात मोठी खासियत यातील बॅटरी आहे, कारण हा ६०००एमएएचच्या बॅटरीसह आहे. त्याचबरोबर चार्जिंगसाठी २५ वॉट टाइप सी चार्जिंग देण्यात आली आहे. अन्य फीचर्स पाहता मोबाइलमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे अनेक फीचर्स मिळतात. ऑपरेटिंग सिस्टम पाहता Samsung Galaxy M15 5G लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर आधारित आहे. इतकेच नव्हे तर युजर्सना चार अँड्रॉइड अपडेट आणि ५ वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देखील मिळतील.