सूर्यावर नव्हे पृथ्वीवर पडली चंद्राची काळी सावली; अंतराळातून असे दिसले सूर्यग्रहण, पाहा विडिओ

Solar Eclipse 2024: सोमवार, ८ एप्रिल रोजी भारत वगळता जगातील अनेक भागांतून सूर्यग्रहण बघितले गेले. संपूर्ण सूर्यग्रहण अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या अनेक भागात दिसले आहे. भारतासह जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि सामान्य लोकांना हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून ऑनलाइन बघायला मिळाला. या सूर्य ग्रहणाची छायाचित्रे आता समोर आली आहेत. पृथ्वीपासून तब्बल ४०० किलोमीटर उंचीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) या ग्रहणाचे फोटोज टिपण्यात आले. यावेळी समोरच्या दृश्याने वैज्ञानिकांना थक्क केले.

पृथ्वीवर बघायला मिळाली काळी सावली

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS वरून घेतलेल्या व्हिडिओमध्ये पृथ्वीचा एक भाग काळ्या रंगाने व्यापलेला दिसत आहे. हे दृश्य लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे. आपल्या सोशल हँडलवर व्हिडिओ शेअर करताना, ISS अकाउंटने लिहिले आहे की, Expedition-७१चा क्रू पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना सोमवारी दुपारी सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली ही पृथ्वीवर देखील पडलेली बघायला मिळाली.

जेव्हा हा व्हिडिओ ISS वरून बनवला त्यावेळी कॅनडा देशात हे ग्रहण बघायला मिळत होते. व्हिडीओमध्ये पृथ्वीच्या वर दिसणारे काळे ठिपके हे ग्रहणामुळे प्रभावित झालेले क्षेत्र आहे, तर निळ्या रंगात दिसणाऱ्या भागावर ग्रहणाचा परिणाम होत नाही. हा व्हिडिओ काही तासांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर स्पेस स्टेशन

इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीपासून ४०० किलोमीटर उंचीवर असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत आहे. यामध्ये अमेरिका, रशिया आणि त्यांच्या सहयोगी देशांतील अंतराळवीरांची टीम नेहमीच तैनात असते आणि अंतराळाशी संबंधित मोहिमा पूर्ण करत असते

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सुमारे ७.६ किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीभोवती फिरते. या काळात ते २४ तासांत १६ वेळा पृथ्वीभोवती फिरते. ISS च्या परिभ्रमण मार्गाने आपल्या पृथ्वीच्या लोकसंख्येच्या ९० टक्क्यांहून अधिक भाग व्यापला आहे. ISS पृथ्वीच्या ज्या भागातून जातो त्या रेंजमध्ये असलेल्या प्रत्येक देशाची छायाचित्रे घेते.

Source link

astronomyISSsolar eclipse 2024Solar Eclipse moonspace station
Comments (0)
Add Comment