आता जीमेलच्या कंटाळवाण्या लांब मेसेजपासून मिळेल सुटका; येत आहे नवीन एआय फीचर, जाणून घ्या कसे करेल काम

Gmail हा एक महत्त्वाचा ईमेल प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन युजर असाल तर तुम्ही Gmail वापरला असेल. त्याशिवाय स्मार्टफोनचे काम करणे कठीण होते. याशिवाय कॉर्पोरेट जगतात तर जीमेलशिवाय जगणे शक्य नाही. जीमेलच्या लांबलचक कंटाळवाण्या मेसेजमुळे अनेकवेळा यूजर्स नाराज होतात हेही खरे असले तरी आता यातून त्यांची आता लवकरच सुटका होणार आहे.

Gmail चे ईमेल फीचर

तुम्ही जर Gmail युजरअसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण Gmail युजर्सना लवकरच AI फीचर मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स चॅट करू शकतील. अहवालानुसार, Gmail ॲपच्या अँड्रॉइड व्हर्जन युजर्ससाठी लवकरच ‘Summarize This Email’ हे नवीन फीचर आणले जाऊ शकते. याशिवाय, Google ॲपच्या Android व्हर्जनसाठी एक नवीन टॉगल बटण दिले जाईल, ज्यामध्ये जेमिनी सपोर्ट असेल.

नवीन फीचर कसे कार्य करेल?

‘Piunikaweb’ आणि ‘tipster AssembleDebug’ च्या अहवालानुसार, Gmail ॲपचे नवीन Android फीचर तुमच्या लांबलचक मेल्सचा सारांश (summary ) देईल. अशा प्रकारे तुमचा वेळ वाचेल. अहवालानुसार, सब्जेक्ट लाईनच्या खाली summarize हे मेल फीचर दिले जाईल. सध्या, हे फीचर फक्त वर्कस्पेस युजर्ससाठी उपलब्ध आहे. जीमेलच्या वेब व्हर्जनमध्ये याचा वापर करता येईल.

लवकरच सुरू होणार आहे

अहवालानुसार, हे फीचर सध्या प्रायमरी टेस्टिंग टप्प्यातून जात आहे, जेव्हा हे फीचर पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा ते ईमेलच्या वरच्या मोठ्या आकाराच्या विंडोमध्ये दिसेल. यासोबतच यूजर्सना लवकरच एक नवीन टॉगल बटण दिले जाईल, ज्याद्वारे यूजर्स ‘Google Search’ आणि ‘Gemini AI’ वर शिफ्ट होऊ शकतील.

Source link

Androidgmailgoogleअँड्रॉइडगुगलजीमेल
Comments (0)
Add Comment