ॲमेझॉनने उघडला आहे ‘बाजार’!, आता प्रत्येक वस्तू 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत; मिशोला देणार टक्कर

आता मीशोला लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon कडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी मिळालेल्या संकेतांनुसार , ‘बाजार’ अखेर लॉन्च झाला आहे. ज्या ग्राहकांना स्वस्त दरात फॅशन उत्पादने खरेदी करायला आवडतात त्यांच्यासाठी Amazon चे नवीन शॉपिंग प्लॅटफॉर्म ‘बाजार’ आले आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक उत्पादन 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते.या लॉन्चसह, Amazon मीशोसारख्या शॉपिंग ॲप्सशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे.

ॲमेझॉन ॲपचाच एक भाग

कंपनीने ‘बाजार’ ॲपला ॲमेझॉन ॲपचा एक भाग बनवले आहे आणि ते अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन ॲपच्या डेडिकेटेड सेक्शनमध्ये दाखवले जात आहे. येथे गेल्यानंतर, युजर्सना अनेक विविध कॅटेगरीमध्ये खरेदी करण्याचे पर्याय मिळतील आणि सर्व उत्पादनांची किंमत 600 रुपयांपेक्षा कमी असेल.

600 रुपयांपेक्षा कमी किमतीत काय मिळेल?

Amazon ने आपल्या नवीन ‘बाजार’ प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना विविध कॅटेगरीमध्ये खरेदी करण्याचा पर्याय दिला आहे आणि त्यांना प्रत्येक वस्तू 600 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल. ग्राहक ‘बाजार’ मधून कपड्यांपासून फॅशन ॲक्सेसरीज, दागिने, बॅग-पर्स, शूज आणि फॅशनेबल पोशाखांपर्यंत सर्व काही खरेदी करू शकतात. याशिवाय स्वयंपाकघरातील साधने, टॉवेल, बेडशीट आणि सजावटीच्या वस्तू यांसारख्या घरगुती वस्तूही स्वस्त दरात मिळतील.

अमेझॉन ॲपमधुनच ‘बाजार’ मध्ये प्रवेश

चांगली गोष्ट म्हणजे स्वस्तात खरेदी करण्याच्या या ऑप्शन्साठी तुम्हाला कोणतेही नवीन ॲप डाउनलोड करण्याची किंवा अकाउन्ट तयार करण्याची गरज नाही. अमेझॉन ॲपमधुनच तुम्ही ‘बाजार ‘मध्ये सहज प्रवेश करू शकता.

Source link

amazonbazarmeeshoबाजारमिशोॲमेझॉन
Comments (0)
Add Comment