Samsung करत आहे मोठी तयारी, भारतात लवकरच येतील दोन नवीन दमदार स्मार्टफोन

Samsung Galaxy M35 5G आणि Galaxy F35 5G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. अलीकडेच कंपनीनं देशात Galaxy M Series चे दोन स्मार्टफोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. आता कंपनी एम सीरीजमध्ये आणखी एक फोन आणि Galaxy F Series चा एक नवीन फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आले आहेत. यामुळे फोन्स लवकरच लाँच होतील, अशी चर्चा आहे. चला जाणून घेऊया माहिती.

Samsung Galaxy M35 आणि Galaxy F35 कधी येणार भारतात

Samsung Galaxy M35 आणि Galaxy F35 स्मार्टफोन्स BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे की हे दोन्ही आगामी फोन्स भारतात लवकरच लाँच केले जाऊ शकतात. Samsung Galaxy M35 चा मॉडेल नंबर SM-M356B/DS आणि Galaxy F35 चा मॉडेल नंबर SM-E356B/DS असेल.मॉडेल नंबर मधील DS चा अर्थ असा आहे की फोन्समध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट आहे. BIS लिस्टिंगमध्ये आगामी स्मार्टफोन्सच्या इतर स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला नाही.

Galaxy M35 मध्ये मिळू शकतात हे फीचर्स

याआधी Galaxy M36 बेंचमार्किंग साइट Geekbench च्या डेटाबेस मध्ये SM-M356B मॉडेल नंबरसह दिसला होता. लिस्टिंगनुसार या फोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर दिला जाईल. हा Mali G68 GPU आणि ६ जीबी रॅमसह येईल. तसेच हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित OneUI वर चालेल.
हा फोन Samsung Galaxy A35 5G वर आधारित असू शकतो. परंतु, यात काही फीचर्स वेगळे मिळू शकतात. या फोनमध्ये ६.६ इंचाचा sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो.

यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोन ५० एमपीचा मेन कॅमेरा, ८ एमपीचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि ५ एमपीची मॅक्रो लेन्स मिळते. हा ५००० एमएएचच्या बॅटरीसह येते. यात स्टीरियो स्पिकर असे फीचर्स मिळतात. सध्या सॅमसंगच्या या दोन्ही अपकमिंग फोन्स बाबत कोणतीही अधिक माहिती समोर आली नाही.

Source link

samsungsamsung galaxy f35 5gsamsung galaxy m35 5gगॅलेक्सी एफ३५ ५जीसॅमसंग गॅलेक्सी ए३५ ५जी
Comments (0)
Add Comment