‘त्या’ दोघी बहिणी दवाखान्यात उपचारासाठी गेल्या आणि…

हायलाइट्स:

  • विट्यात दवाखान्याचा स्लॅब कोसळून महिला रुग्ण ठार.
  • दवाखान्याच्या पायरीवर बसली असतानाच घडली दुर्घटना.
  • गंभीर जखमी बहिणीला सांगली येथील रुग्णालयात हलवले.

सांगली:विटा येथे दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक रुग्ण महिला ठार झाली, तर तिची सख्खी बहिण गंभीर जखमी झाली आहे. अनिता सुरेश माळी (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर अलका बबन शिंदे या जखमी आहेत. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विटा पोलिसात नोंद झाली आहे. ( Sangli Vita Clinic Slab Collapse Update )

वाचा:अनिल परब यांचा सोमय्यांविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा दावा; ७२ तास उलटताच…

याबाबत अधिक माहिती अशी की, विट्यातील लेंगरे रस्त्यावर डॉक्टर दीपक कुलकर्णी यांचा आशीर्वाद क्लिनिक या नावाचा दवाखाना आहे. या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आयटीआय कॉलेज समोरील अनिता सुरेश माळी आणि त्यांची बहीण अलका बबन शिंदे या आल्या होत्या. आत दुसरे रुग्ण असल्याने त्या दोघीही बाहेर पायरीवर आपसांत बोलत बसल्या होत्या. त्याचवेळी दवाखान्याच्या इमारतीचा पुढचा स्लॅब कोसळला. स्लॅबचा हा भाग नेमका खाली बसलेल्या महिलांच्या अंगावर कोसळला. यात डोक्याला आणि मेंदूला जबर मार लागल्याने अनिता माळी यांचा जागीच मृत्यू झाला तर अलका शिंदे यांच्या डोक्यास, कंबर आणि पायाला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा:मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांचा नवा आरोप; ‘त्या’ घोटाळ्याचे ईडीला दिले पुरावे

Source link

clinic slab collapses in sangliclinic slab collapses in sangli updatessangli latest newssangli vita clinic slab collapsesangli vita clinic slab collapse updateअनिता सुरेश माळीअलका बबन शिंदेडॉक्टर दीपक कुलकर्णीविटासांगली
Comments (0)
Add Comment