AI 2026 पर्यंत मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होईल
राउटर्सच्या रिपोर्टनुसार, जेव्हा एलोन मस्क यांना एजीआय (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स) विकसित होण्याच्या वेळेबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले,”जर तुम्ही एजीआयला मानवापेक्षा वेगवान मानत असाल, तर मला वाटते की असे एक किंवा दोन वर्षात होऊ शकते”.
एआयची बुद्धिमत्ता बनला वादाचा विषय
इलॉन मस्क यांचा हा दावा अशा वेळी समोर आला आहे जेव्हा ते त्यांच्याच कंपनी OpenAI सोबत कायदेशीर लढाईत अडकले आहेत. ओपनएआयचा मूळ उद्देश समाजाच्या फायद्यासाठी एआयचा वापर करणे हा होता, परंतु कंपनी मूळ उद्देशापासून विचलित झाली असल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे. मस्क यांच्या या विधानामुळे एआयच्या विकासावर काय नैतिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात या चर्चेला आणखी उत्तेजन मिळते. एआय आणि मानवांबद्दल बोलण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच त्यांनी असेही म्हटले होते की, 2029 च्या अखेरीस AI संपूर्ण मानवजातीच्या बुद्धिमत्तेला मागे टाकेल.
पुढील वर्षापर्यंत एआय कोणत्याही मानवापेक्षा अधिक बुद्धिमान बनण्याची शक्यता असल्याचे आता ते बोलले आहेत. नुकतेच एका पॉडकास्टमध्ये पाहुणे असलेले अमेरिकन कॉम्प्युटर शास्त्रज्ञ रे कुर्झवील म्हणत होते की, ”कदाचित लोकांना असे वाटते की एआयला मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान होण्यासाठी 100 वर्षे लागतील. परंतु एआय हे स्थान खूप लवकर कदाचित फक्त पुढील 5 वर्षांतच गाठू शकते” रे यांचे हे भाकीत एलोन मस्कच्या अगदी जवळ आहे.
धोका असला तरीही चांगल्या कामांसाठी AI फायदेशीर
इलॉन मस्क यांनाही एआय मानवांसाठी धोकादायक असल्याची भीती वाटत आहे. पण बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, धोका असला तरीही चांगल्या कामांसाठी AI खूप फायदेशीर ठरू शकते, असे त्यांचे मत आहे.