WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp एका नवीन टूलवर काम करत आहे. हे टूल फोटो, व्हिडिओ आणि GIF वर टेक्स्ट लिहिणे सोपे होईल. हे नवीन टूल वापरण्यासाठी अधिक आधुनिक असेल आणि याच्या मदतीने तुम्ही पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने मेसेज एडिट करू शकाल.
टूलबार काम सोपे करेल
हे फिचर सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. iOSच्या बीटा रेंज 2.24.9.6 हे फिचर देण्यात आले आहे. या नवीन फीचरमध्ये, ब्रश आणि कलर पिकर यांसारख्या तुम्ही पेंट किंवा ड्रॉ करण्यासाठी वापरत असलेल्या गोष्टी स्क्रीनच्या तळाशी असलेल्या टूलबारमध्ये मिळणार आहेत. सध्या, या गोष्टी स्क्रीनच्या वर असतात, ज्यावर अनेक युजर्सने नाराजी व्यक्त केली आहे.
मिळतील २४ नवे रंग
या फिचरमुळे एडीटींग सोपी होणार आहे. वर्ष आणि कलर निवडीचा ऑप्शन हा वर देण्यात येतो यामुळे मोठा स्मार्टफोन युज करणाऱ्यांसाठी अडचण निर्माण होते. या नवीन फीचरमध्ये ते खाली आणले जाईल. यामुळे युजर्ससाठी सोपे होणार आहे. यात तुम्हाला रंग निवडणे देखील शक्य होणार आहे. यात एकूण २४ रंग दिले जाणार आहे.