तुम्हाला माहितीये..१ टनचा AC एका तासात किती वीज वापरतो, जाणून घ्या

एसी हा सामान्य उपकरणांपेक्षा अधिक वीज वापरतो असा अनेकांचा समज आहे आणि काही अंशी ते सत्य देखील आहे. एसीची कपॅसिटी ही टन्सवर मोजण्यात येते. अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की १ टनचा एअर कंडिशनर १ तास चालवला तर किती वीज वापरली जाईल. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर चला उत्तर जाणून घेऊया..
  • १ टन क्षमता असलेल्या एसीचा विजेचा वापर पुढील गोष्टींवर अवलंबून असतो
  • AC चे स्टार रेटिंग: ५-स्टार AC १-स्टार AC पेक्षा कमी वीज वापरतात.
  • खोलीचे तापमान: खोलीचे तापमान जितके जास्त असेल तितकी एसी जास्त वीज वापरेल.
  • खोलीचा आकार: खोलीचा आकार जितका मोठा असेल तितकी एसी जास्त वीज वापरेल
  • एसीचा वापर: तुम्ही एसी सतत चालवत असाल तर त्यात जास्त वीज लागते.
  • सरासरी, १ टन एअर कंडिशनर १ तासात ८०० ते १२०० वॅट पॉवर वापरतो. याचा अर्थ ताशी १ युनिट ते १.५ युनिट विजेचा वापर होईल.

उदाहरणाद्वारेसमजूनघ्या

जर तुम्ही १ टनचा ५-स्टार एसी दिवसाचे ८ तास चालवला तर तो दरमहा सुमारे १२० युनिट इतकी वीज वापरेल. तुम्ही १ टन ३-स्टार एसी दिवसाचे ८ तास चालवल्यास, ते दरमहा सुमारे १८० युनिट वीजेचा वापर करतो.

अशाप्रकारेकमीकराविजेचावापर

तुमचा एसी कमी तापमानावर सेट करा. 24 अंश सेल्सिअस हे एक योग्यतापमान आहे. तुम्ही खोलीत नसताना एसी बंद करा. पंखा वापरा. पंख्याचा वापर करून तुम्ही खोलीतील तापमान कमी करू शकता आणि एसीचा वापर कमी करू शकता. तसेच तुमच्या एसीची नियमित सर्व्हिसिंग करा.

Source link

ac power consumptionAC usageair conditionerelectricityenergy consumption
Comments (0)
Add Comment