फेक मेसेजवर लावणार रोख
अज्ञात व्यक्तीने मेसेज केल्यास या फीचरमुळे सूचना मिळणार आहे. युजर्सला यामुळे कोणत्याही लिंकवर घाईघाईने क्लिक करण्यापूर्वी विचार करण्याची आणखी एक संधी देईल. बऱ्याचदा बनावट संदेश वास्तविक दिसतात आणि लोक त्यांची सत्यता न तपासता घाईघाईने लिंकवर क्लिक करतात.
असा देईल इशारा
Tipster PiunikaWeb नुसार, आता गुगल मेसेजेस ॲपमध्ये चॅट दरम्यान मिळालेल्या लिंकवर पूर्वीपेक्षा जास्त लक्ष दिले जात आहे. पूर्वी, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून लिंक मिळाल्यास, Google Messages फक्त विचारेल की तुमचा त्या नंबरवर विश्वास आहे का. पण आता गोष्टी थोड्या क्लिष्ट झाल्या आहेत. नवीन अपडेटमध्ये ‘वॉर्निंग: हा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाही’ असे स्पष्टपणे लिहिले आहे आणि ‘अज्ञात लोकांकडून आलेल्या लिंक्स चुकीच्या किंवा हानिकारक गोष्टी उघडू शकतात’ असेही लिहिले आहे. आता तुम्हाला एका बॉक्समध्ये ‘मला माहित आहे की ही लिंक हानिकारक असू शकते’ असे लिहून खात्री करावी लागेल आणि नंतर तुम्ही ती लिंक उघडू शकता. अन्यथा, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते उघडणे रद्द करू शकता.
लवकरच होईल लॅान्च
फिचरबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत हे फीचर फक्त आरसीएस मोडमध्येच देण्यात आले आहे. हे नवीन फीचर लवकरच जगभरातील अँड्रॉइड युजर्ससाठी येईल अशी अपेक्षा आहे.