जगातील पहिला खराखुरा Waterproof Smartphone! अ‍ॅप्पल नव्हे Oppo घेऊन येत आहे सर्वात टिकाऊ फोन

Oppo लवकरच एक नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे, जो जगातील पहिला ‘पूर्णपणे वॉटरप्रूफ’ फोन असेल, असा दावा कंपनीनं केला आहे. या फोनचे नाव Oppo A3 Pro असेल आणि हा १२ एप्रिलला लाँच होईल. फोनचे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी यात IP69 रेटिंग मिळाली आहे. कंपनीचा दावा आहे की A3 Pro चा डिस्प्ले देखील वॉटरप्रूफ आहे आणि उंचावरून पडल्यावर देखील हा तुटणार नाही. एकंदरीत Oppo चं म्हणणं आहे की, त्यांचा हा नवीन फोन खूप टिकाऊ आहे.

Oppo A3 Pro कधी येणार भारतात?

Oppo A3 Pro सर्वप्रथम चीनमध्ये लाँच होईल आणि नंतर इतर बाजारपेठांमध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु अजूनतरी हा फोन भारतात येईल की नाही हे स्पष्ट झालं नाही. परंतु Oppo कंपनीनं याआधी देखील A सीरीजचे फोन भारतात लाँच केले आहेत. त्यामुळे आता वाट पाहावी लागेल की हा फोन भारतात येतोय की नाही, परंतु आधी या फोनच्या काही फीचर्सची माहिती जाणून घेऊया.

Oppo A3 Pro Expected Specs

प्रसिद्धे टिप्सटर Digital Chat Station नं चीनी सोशल मीडिया वेबसाइट वीबोवर दावा केला आहे की Oppo A3 Pro मध्ये मोठी स्क्रीन आणि बॅटरी मिळेल. त्याचा माहितीनुसार, या फोनमध्ये ६.७ इंचाची एचडी स्क्रीन मिळेल जी १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ही कर्व्ह एज ओएलईडी स्क्रीन असेल. फोनमध्ये ५,०००एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. अशी चर्चा आहे की हा फोन MediaTek 7050 प्रोसेसरवर चालेल जी एक ५जी चिप आहे.

लीकनुसार, या फोनमध्ये १२जीबी पर्यंतचा रॅम आणि ५१२जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. त्याचबरोबर फोनच्या मागे तीन कॅमेरा असण्याची देखील शक्यता आहे. मुख्य कॅमेरा ६४-मेगापिक्सलचा असू शकतो, तर इतर दोन कॅमेऱ्यांची माहिती मिळाली नाही. Oppo कंपनीचे अध्यक्ष बो लियू यांनी चीनमध्ये होणाऱ्या लाँच बाबत बोलताना सांगितलं आहे की, ‘Oppo A3 Pro जगातील पहिला ‘पूर्णपणे वॉटरप्रूफ’ फोन आहे, जो खूप मजबूत असेल आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह येईल. हा A सीरीज फोनमध्ये Oppo च्या टिकाऊ टेक्नॉलॉजीचा पहिल्यांदाच होणारा वापर आहे. हा फोन फक्त पाण्यात पडल्यावर सुस्थितीत राहणार नाही तर उंचावरून पडल्यावर देखील त्याला जास्त इजा होणार नाही. तसेच कंपनी ए२ प्रो ‘चार वर्षाच्या बॅटरी वॉरंटी’ ला आणखी चांगली बनवत आहे.’

Source link

oppooppo a3 prooppo mobileओप्पो ए३ प्रोओप्पो मोबाइल
Comments (0)
Add Comment