Smartphone Flash Notifications: स्मार्टफोन निर्माता कंपन्या अनेक असे फोन बाजारात घेऊन आल्या आहेत, ज्यांच्या मागे स्टाइलिश लाइट्स आहेत. या लाइट्सचा वापर फोन कॉल किंवा मेसेज नोटिफिकेशन दरम्यान नोटिफाय करण्यासाठी केला जातो. त्यामुळे फोन सायलंट असला तरी तुमचा महत्वाचा कॉल किंवा मेसेज मिस होणार नाही. फोनच्या बॅकवर ब्लिंक होणारी लाइट तुम्हाला कॉल व मेसेजचे संकेत देते. परंतु तुम्हाला माहिती आहे का हे कूल फीचर मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन फोन खरेदी करण्याची गरज नाही. तुम्ही काही शुल्लक सेटिंग बदलून तुमच्या सध्याच्या फोनमध्ये देखील हे फीचर मिळवू शकता.
स्मार्टफोनमध्ये अशाप्रकारे इनेबल करा ‘Flash Notifications’ ऑप्शन
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये फ्लॅश नोटिफिकेशन फीचर उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीनं कॉल किंवा मेसेज आल्यावर फोनची फ्लॅश लाइट ब्लिंक होऊ लागते. त्यामुळे फोन सायलंट असल्यावर देखील तुमचे कॉल व मेसेज मिस होणार नाहीत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे फीचर आपल्या फोनमध्ये कसं ऑन करता येईल. फोनमध्ये फ्लॅश नोटिफिकेशन इनेबल करणं खूप सोपं आहे. पुढे आम्ही याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस सांगितली आहे.
स्मार्टफोनमध्ये अशाप्रकारे इनेबल करा ‘Flash Notifications’ ऑप्शन
- फोनमध्ये Flash Notifications ऑन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनची Settings ओपन करा. त्यानंतर स्क्रोल डाउन करून खाली जा.
- आता तुम्हाला खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये Accessibility चा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा.
- Accessibility सेक्शनमध्ये तुम्हाला Flash Notifications चा ऑप्शन दिसेल. यात Incoming Calls आणि Messages चे ऑप्शन आहेत.
- तुम्हाला हवं असल्यास फोन सायलंट असल्यावर तुमच्या फोनवर कॉल आल्यावर फ्लॅश लाइट चमकावयाची असेल तर तुम्ही इनकमिंग कॉल्सचा ऑप्शन टॉगल ऑन करू शकता.
- जर तुम्हाला फोनवर येणाऱ्या मेसेजवर देखील फ्लॅश लाइट चमकावी असे वाटत असेल तर तुम्हाला मेसेजच्या बाजूचं टॉगल ऑन करावा लागेल. त्यामुले फक्त कॉलच नव्हे तर मेसेजवर देखील तुमच्या फोनची फ्लॅश लाइट चमकू लागेल.
- ही सेटिंग तुमच्या खूप कामी येईल. हे फीचर ऑन झाल्यानंतर जरी तुमचा फोन सायलंट असला तरी मागे ब्लिंक होणारी लाइट कॉलचे संकेत देईल.