कुठल्या प्रकारचा डिस्प्ले फोन विकत घ्यावा?
तुम्ही नेहमी AMOLED किंवा Super AMOLED किंवा OLED डिस्प्ले असलेले स्मार्टफोन खरेदी केले पाहिजेत. कारण या डिस्प्लेमध्ये चांगले रंग उपलब्ध आहेत. तसेच हा डिस्प्ले कमी बॅटरी वापरतो.
स्क्रीन प्रोटेक्शन
जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहेच. स्मार्टफोन जास्त वेळ वापरल्याने झोपेची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत नेहमी निळा प्रकाश असलेला स्मार्टफोन खरेदी करावा.
कर्व्हड डिस्प्ले फोन
जर तुम्हाला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुम्ही कर्व्हड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन घ्यावा, कारण तो तुम्हाला केवळ उत्तम कंटेंट डिस्प्लेच देत नाही तर तुम्हाला पाहण्याचा चांगला अनुभव देखील देतो.
फोनचा ब्राइटनेस
तुम्ही नेहमी जास्त ब्राइटनेस असलेला स्मार्टफोन खरेदी करावा. साधारणपणे असे दिसून येते की, युजर्स 500 ते 700 nits पीक ब्राइटनेस असलेले स्मार्टफोन खरेदी करतात. परंतु अशा फोनमधील कंटेंट तेजस्वी सूर्यप्रकाशात दिसत नाही. तथापि, जास्त चमक देखील डोळ्यांना इजा पोहचवू शकते. तसेच यामुळे बॅटरीचे लाईफ लवकर डिस्चार्ज होते. अशा स्थितीत फोनमध्ये डार्क मोड असायला हवा. तसेच, ॲडॅप्टिव्ह ब्राइटनेस फीचर दिले असल्यास ते अधिक चांगले होईल.
रीफ्रेश रेट
तुम्ही नेहमी हाय रिफ्रेश रेट असलेला स्मार्टफोन खरेदी करावा. बाजारात 90 ते 120Hz रिफ्रेश रेट असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. हाय रिफ्रेश रेट असलेल्या स्मार्टफोनची स्क्रीन स्मूथनेस चांगली आहे.