OnePlus Phone च्या विक्रीवर बंदी
येत्या काही दिवसांत रिटेल स्टोर्सवर वनप्लस मोबाइल फोन आणि टॅबलेटची विक्री बंद होऊ शकते. साउथ इंडियन Organized Retailers Association (ORA) नं घोषणा केली आहे की असोसिएशन अंतगर्त येणाऱ्या रिटेलर्समध्ये OnePlus डिवाइसेसची विक्री बंद केली जाईल. South Indian ORA नं वनप्लस इंडियाचे सेल्स डायरेक्टर रणजित सिंह यांना पत्र लिहून १ मेपासून वनप्लस फोन्सची विक्री बंद केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.
ऑफलाइन मार्केटमध्ये वनप्लसवर बंदी का?
मीडिया रिपोर्टनुसार वनप्लस इंडियाच्या रंजीत सिंह यांना ORA नं पाठवलेल्या पत्रात रिटेलर्स आणि मोबाइल दुकानदारांना येणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला आहे. असोसिएशन नुसार कंपनीच्या low-profit margins (नफ्याची टक्केवारी) दुकानदारांना सर्वाधिक नुकसान होते.
तसेच कंपनी वॉरंटी क्लेम आणि सर्व्हिस देण्यास उशीर करते आणि त्यामुळे दुकानदार आणि रिटेलर्सना ग्राहकांचा रोष पत्करावा लागतो. तसेच असोसिएशननं वनप्लसच्या लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट विषयी देखील नाराजगी दर्शवली आहे.
कुठे बंद होईल OnePlus Phone ची विक्री?
साउथ इंडियन ऑर्गनाइज्ड रिटेलर्स असोसिएशनच्या अंतर्गत Poorvika Mobiles, Sangeetha Mobiles, Big C आणि Pooja अश्या मोठ्या रिटेल चेन्ससह देशातील ४५०० स्टोर्स येतात. त्यामुळे या ब्रँड्सच्या स्टोर्सवर येत्या १ मेपासून वनप्लस फोनची विक्री बंद होऊ शकते. नावाप्रमाणे या असोसिएशनच्या निर्णयाचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होऊ शकतो. ज्यात महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांत वनप्लस प्रोडक्ट्सच्या विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते.