Infinix Note 40 Pro 5G सीरिजची किंमत आणि उपलब्धता
Infinix Note 40 Pro 5G च्या ८जीबी रॅम आणि २५६जीबी व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपये आहे. तर Infinix Note 40 Pro+ 5G च्या १२जीबी रॅम व २५६जीबी व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. आज या फोन्सचा फ्लिपकार्टवर अर्लीबर्ड सेल सुरु झाला आहे. लाँच ऑफर अंतगर्त Infinix Note 40 Pro 5G सीरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४९९९ रुपयांचे मॅगकिट फ्री मिळत आहे, ज्यात मॅगकेस आणि मॅगपॉवर पावर बँकचा समावेश आहे. ग्राहक Inifnix Note 40 Pro 5G सीरीज Obsidian Black, Titan Gold आणि Vintage Green या तीन कलर ऑप्शनमध्ये विकत घेऊ शकतील.
Infinix Note 40 Pro+ 5G, Note 40 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 40 Pro+ मध्ये १००वॉट चार्जिंग स्पीडसह ४६००एमएएचची बॅटरी आहे. तर Note 40 Pro मध्ये ४५वॉट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएचची बॅटरी आहे. Note 40 Pro 5G Series मॅग्नेटिक चार्जिंग सोल्युशन सह २०वॉट मॅग्नेटिक मॅग केस, मॅग पॅड आणि मॅग पावर (वायरलेस चार्जिंग पावरबँक) च्या माध्यमातून वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. २०वॉट मॅग पावर आणि १५वॉट मॅग पॅड Qi & EPP स्टँडर्ड प्रोटोकॉलचा सपोर्ट देखील आहे. Note 40 Pro 5G सीरीजमध्ये एक वेगळी पावर मॅनेजमेंट चिप Infinix Cheetah X1 देण्यात आली आहे जो पहिला अँड्रॉइड मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सोल्युशन आहे.
Infinix Note 40 Pro+ 5G आणि Note 40 Pro 5G मध्ये ६.७८-इंच FHD+ कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२०हर्ट्झ, १३०० निट्स पीक ब्राइटनेस, २१६०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन आहे. कॅमेरा सेटअप पाहता Infinix Note 40 Pro सीरीजमध्ये OIS सपोर्टसह १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
दोन्ही फोन ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ७०२० प्रोसेसरसह आले आहेत. Note 40 Pro+ 5G आणि Note 40 Pro 5G अँड्रॉइड १४ वर आधारित एक्सओएस १४ कस्टम स्किनवर चालतात. Note 40 Pro+ 5G मध्ये १२जीबी रॅम आहे, जो २४जीबी पर्यंत वाढवता येतो. तर Note 40 Pro 5G मधील ८जीबी रॅम १६जीबी पर्यंत वाढवता येतो. Infinix तीन वर्ष सिक्योरिटी पॅच अपडेट आणि दोन अँड्रॉइड अपग्रेड देणार आहे.
Infinix Note 40 Pro सीरीजमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये जेबीएलचे ड्युअल स्पिकर देण्यात आले आहेत जे ३६०° सिममेट्रिकल साउंड देतात. स्मार्ट होम इंटीग्रेशनसह Infinix Note 40 Pro 5G सीरीजमध्ये आयआर रिमोट फीचर आहे. यात आयपी५३ रेटिंग आणि एनएफसी सपोर्ट देखील आहे.