Jio IPSTB मध्ये काय असेल खास?
नवीन Jio IPSTB सेट-टॉप बॉक्स कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये बघायला मिळेल यासह वरच्या बाजूला जिओचा लोगो देखील दिसेल. हिट न होण्यासाठी या बॉक्समध्ये कुलर फॅन देण्यात येईल वमागील बाजूस विविध पोर्ट्स दिले आहेत. कंपनीने संफलगितल्यानुसार २GB रॅम, ३२GB ऑनबोर्ड स्टोरेजसह असलेला हा बॉक्स ४K HDR स्ट्रीमिंगला सपोर्ट करेल. सोबत पुरवलेल्या रिमोटमध्ये नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टारसह चार ओटीटी ॲप्ससाठी खास बटणे देण्यात आली आहेत. याशिवाय, रिमोटमध्ये व्हॉईस कमांड सपोर्ट देखील उपलब्ध आहे, म्हणजेच वापरकर्ते बोलून सेट-टॉप बॉक्स कंट्रोल करू शकतात.
५५०हून अधिक चॅनेल्सची मेजवानी
सेट-टॉप बॉक्स AndroidTV OS वर आधारित JioOS २.० वर चालेल आणि Netflix, Amazon Prime Video, Disney Plus Hotstar, Zee५, Discovery Plus, Sun NXT, Sony Liv आणि JioCinema यासह अनेक लोकप्रिय OTT ॲप्सना सपोर्ट करेल. वापरकर्ते Jio Store वरून इतर OTT ॲप्स आणि गेम देखील डाउनलोड करू शकतात. याव्यतिरिक्त, युजर्स आयपीटीव्ही सेवेद्वारे ५५० हून अधिक थेट टीव्ही चॅनेल देखील पाहू शकतात, जी लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सेट टॉप बॉक्सवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, एचडीएमआय पोर्ट, इथरनेट पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट आणि पॉवर पोर्ट यांचा समावेश आहे.
नवीन सेट-टॉप-बॉक्स कसा मिळेल
नवीन Jio IPSTB नवीन Jio AirFiber ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. सेवेबद्दल चौकशी करण्यासाठी आणि नवीन कनेक्शन बुक करण्यासाठी वापरकर्ते त्यांच्या जवळच्या जिओ स्टोअरला भेट देऊ शकतात किंवा ६०००८-६०००८ वर मिस्ड कॉल देऊ शकतात. बॉक्समध्ये, वापरकर्त्यांना एक HDMI केबल, एक इथरनेट केबल, एक व्हॉइस-ॲक्टिव्हेटेड रिमोट आणि पॉवर ॲडॉप्टर मिळेल.