हल्ली तुमचेही हात दुखतात? मोबाईल ठरतोय या त्रासाचे कारण, जाणून घ्या कसे

स्मार्टफोन प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नोकरी व व्यवसायाशी साबंधित असो किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ पाहणे असो, हे सर्व काम आपण स्मार्टफोनवरच करतो. यामुळे आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होत असतात, ज्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. फोन किंवा स्क्रीन अधिक वेळ बघितल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो याबद्दल बोलले जाते मात्र अधिक वेळ मोबाईल हातात धरून ठेवल्यामुळे हातांनाही त्रास होतो. आपले लक्ष नेहमी स्क्रीन टाइमवर असते, परंतु त्याचा तुमच्या हातांवर काय परिणाम होतो हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का?

बोटांवर होतो मोठा परिणाम

रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोनच्या वापराचा सर्वात मोठा परिणाम आपल्या हाताच्या बोटांवर दिसून येतो. तुम्हाला दिसेल की हाताच्या पहिल्या बोटावर व अंगठ्यावर याचा गंभीर परिणाम होतो. हे केवळ स्मार्टफोनवरच नाही तर टॅब्लेट आणि व्हिडिओ गेम कंट्रोलरसह देखील होते. जर तुम्ही जास्त टाईप केले तर तुमचा अंगठा आणि बोटे दुखू लागतात. त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडीओ गेम कंट्रोलर जास्त वेळ वापरल्यास तुमचे हात दुखू लागतात. फोन बराच वेळ दाबून ठेवल्याने असेच काहीसे घडते. अनेकवेळा तुमच्या लक्षात आले असेल की फोनमुळे तुमच्या बोटावर एक खूण तयार होते.

फोनमुळे हात दुखण्याचं कारण

आपला हात २७ हाडे, ३५ स्नायू आणि त्यांना जोडणाऱ्या १०० पेक्षा जास्त घटकांनी तयार झाला आहे. या टेंडन्सच्या मदतीने तुम्ही तुमची बोटे वाकवू शकता. कोणत्याही एका जागेवर सतत दाब पडल्यामुळे स्नायूंवर खूप परिणाम होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे स्मार्टफोनचे सतत वाढत जाणारे वजन आणि आकार. एक काळ असा होता की लोकांच्या हातात छोटे फोन असायचे, ज्याचे वजन कमी होते. मग कालांतराने फोनचा आकार आणि वजन वाढतच गेले आणि आता ते इतके जड झाले आहेत की ते आमचे आणि तुमच्या हातांना त्रास पोहचवत आहे.

अधिक वेळ फोन वापरल्यामुळे तुमचा हात दुखत असल्यास खालील गोष्टींकडे तातडीने लक्ष द्या

  • फोन ताबडतोब खाली ठेवा म्हणजेच तो वापरणे बंद करा.
  • जिथे तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तिथे तुम्ही बर्फ वापरू शकता.
  • याशिवाय तुम्ही हीट थेरपीची देखील मदत घेऊ शकता.
  • तुमच्या वेदना वाढत राहिल्यास तुम्हाला डॉक्टरांना दाखवावे लागेल.

Source link

health care tips in marathismarphone user effect on handsmarphone user effect on hand marathismartphonesmartphone use side effects
Comments (0)
Add Comment