वोडाफोन आयडियाचा १२५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
वोडाफोन आयडियाचा १२५ रुपयांचा प्लॅन एक डेटा व्हाउचर आहे जो वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये २८ दिवसांची सर्व्हिस व्हॅलिडिटी मिळते. तसेच, युजर्सना रोज १जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे. त्या हिशोबाने २८ दिवसांचा मिळून ग्राहकांना एकूण २८जीबी डेटा दिला जात आहे. परंतु हा एक डेटा अॅड-ऑन पॅक आहे, त्यामुळे याचा वापर करण्यासाठी युजर्सकडे एक सक्रिय बेस प्रीपेड प्लॅन असणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे असे अनेक डेटा व्हाउचर आहेत ज्यांचा वापर Vi युजर्स रिचार्ज करण्यासाठी करू शकतात. काही प्लॅनमध्ये ओटीटी (ओव्हर-द-टॉप) चा लाभ देखील मिळतात. तसेच, काही फक्त डेटासह येतात. तसेच काही असे देखील प्लॅन आहेत जे रात्रीच्या वेळी अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहेत. त्यामुळे या प्लॅन्समध्ये प्रत्येकासाठी काहींना काही तरी आहे.
१९ व ४९ रुपयांचा डेटा प्लॅन
अलीकडेच कंपनीने १९ रुपयांचा डेटा प्लॅनही लॉन्च केला होता. हे एका दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येते. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी १जीबी डेटा मिळेल. कंपनीने काही दिवसांपूर्वी ४९ रुपयांचा प्लॅनही लाँच केला होता. यामध्ये यूजर्सना एका दिवसाच्या व्हॅलिडिटीसह एकूण २० जीबी डेटा मिळतो.
३९ आणि १६९ रुपयांचा डेटा प्लॅन
ज्यांना स्वस्तात भरपूर डेटा हवा आहे अशा युजर्ससाठी कंपनीचा ३९ रुपयांचा डेटा प्लॅन सर्वोत्तम आहे. कंपनी क्रिकेट ऑफरमध्ये ३९ रुपयांचा प्लान देत आहे. या प्लॅनमध्ये ३जीबी डेटा येतो. या ऑफरमध्ये तुम्हाला ३ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. त्यानुसार, प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा ६जीबी होतो. त्याचप्रमाणे, कंपनी युजर्सना १६९ रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी ८जीबी डेटा देत आहे. यामध्ये तुम्हाला ३० दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे तीन महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.