… तर आम्ही कोर्टात जाऊ; देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

हायलाइट्स:

  • आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी
  • आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक
  • देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

मुंबईः आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना, प्रभाग रचनेचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच, मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या बैठकीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत काय प्रस्ताव आहे, याची मला कल्पना नाही. वॉर्ड रचना, प्रभाग रचना किंवा कुठलीही रचना केली तरी मुंबई किंवा अन्य महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः ‘सामना’ रंगणार; चंद्रकांत पाटलांविरोधात संजय राऊत ठोकणार सव्वा रुपयांचा दावा

मुंबईत विशेषतः काही वॉर्डसची तोडफोड करुन, आपल्याला पाहिजे तसा वॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. पण आम्ही सजग आहोत. निवडणूक आयोगाला कल्पना दिलीये. निवडणूक आयोगाने कृती केली नाही तर कोर्टात जाऊ, असा इशारा फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

वाचाः ‘रिया चक्रवर्तीकडे २ ग्रॅम हेरॉइन सापडल्यावर भंडावून सोडणारे आता गप्प का?’

मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा दिसून आला

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्या आहेत. राज्यपालांच्या या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही उपरोधिक पत्र लिहलं आहे. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कार्यलयाचा अपरिपक्वपणा त्या पत्रातून दिसून आला, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यपालांची भेट घेतं. त्या मागण्यांवर राज्यपाल आपले पत्र जोडतात. याचा अर्थ निर्देश दिले असा होत नाही. ही पद्धत आजपासूनची नाही. गेली २५-३० वर्ष मी राजकारणात हे बघतोय, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः ईडीचा अनुभव कधीपासून आला म्हणणाऱ्या शिवसेनेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

Source link

bmc electiondevendra fadanvismva governmentदेवेंद्र फडणवीसमहाविकास आघाडी सरकारमुंबई महापालिका निवडणुक
Comments (0)
Add Comment