राजनाथ सिंह यांनी जाहीरनाम्याचा प्रत्येक संकल्प हा मोदीच्या गॅरंटीसह युक्त आहे. भारतीय राजकारणात मोदींची गॅरंटी २४ कॅरेटसारखी शुद्ध मानली जाते, असं राजनाथ सिंह म्हणाले. भारतातच नाही तर जगभरातील राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यासाठी एक गोल्ड स्टँडर्ड आहे. मला विश्वास आहे की, जे संकल्प येथे मांडले ते २०४७ पर्यंत एका विकसित भारताच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला आकार आणि विस्तार देईल.
भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय?
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम राबविण्याचं सांगितलं आहे. मच्छीमारांसाठी विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि धान्य सुपरफूड म्हणून विकसित करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. एकलव्य शाळा सुरू करण्याचं आश्वासनही दिलं गेलं आहे. याशिवाय, एससी/एसटी आणि ओबीसींच्या कल्याणासाठी काम करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
जाहीरनाम्यात अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये रामायण उत्सव साजरा करणे, अयोध्येचा पुढील विकास, भ्रष्टाचाराविरोधात कारवाई आदी आश्वासने देण्यात आली आहेत. सत्तेत परत आल्यास देशात न्यायालयीन संहिता लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’वर काम सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. रेल्वेबाबतही जाहीरनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांमधील प्रतीक्षा यादीची समस्या संपुष्टात येईल, असे सांगण्यात आले. याशिवाय ईशान्य भागात बुलेट ट्रेनचे काम सुरू असल्याचीही चर्चा आहे. 5G चा विस्तार आणि 6G चा विकास, ऊर्जेत स्वावलंबी होण्याचे आश्वासनही दिले आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माँ कात्यायनीची पूजा करतो. माँ कात्यायनी आपल्या दोन्ही हातात कमळ घेऊन, हा संयोग मोठा आशीर्वाद. त्यासोबत सोन्याहून पिवळं म्हणजे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. अशा पवित्रवेळी भाजपने विकसित भारताच्या जाहीरनाम्याला देशासमेर ठेवलं. देशवासियांना शुभेच्छा. हा उत्तम जाहीरनामा तयार केल्याबाबत राजनाथ सिंह यांच्या टीमलाही शुभेच्छा.
संपूर्ण देशाला भाजपच्य जाहीरनाम्याची प्रतिक्षा, त्याचं कारण म्हणजे आपल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्टीला गॅरंटीच्या रुपात जमिनीवर उतरवलं. हा जाहीरनामा विकसित भारताचे चार मजबूत स्तंभ, युवाशक्ती, नारीशक्ती, गरीब, किसान या सर्वांना सशक्त करतो. आमचा फोकस डिग्निटी ऑफ लाइ, क्वॉलिटी ऑफ लाइफ, निवेशपासून नोकरीवर आहे. यामध्ये क्वॉंटीटी ऑफ अपॉर्टुनिटी आणि क्वॉलिटी ऑफ अपॉर्चुनिटीवर भर देण्यात आला आहे.
एकीकडे अनेक इन्फ्रास्टक्चरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचं म्हटलं, दुसरीकडे स्टार्टअप आणि ग्लोबल सेंटर्सच्या माध्यमातून हाय व्हॅल्यू सर्व्हिसेसकडे लक्ष देणार आहोत. भाजपचा जाहीरनामा हा तरुण भारताच्या तरुण आकांक्षांचा प्रतिबिंब आहे. भाजप सरकारने गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरीबीत बाहेर काढून आम्ही सिद्ध केलं की आम्ही परिणाम आणण्यासाठी काम करतो.
लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या घोषणा –
- मोफत रेशन योजना पुढच्या पाच वर्षांपर्यंत राहील, मोदींची गॅरंटी
- आयुष्यमान भारत योजनेच्या आधारे गरिबांना ही सुविधा मिळत राहील
- आता घराघरापर्यंत पाईपमार्फत स्वस्त गॅस पोहोचवणार
- ७० वर्षांवरील वृद्धांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळेल
- गरिबांचं कल्याण करणाऱ्या अनेक योजनांचा संकल्प
- मुद्रा योजनेमार्फत आता २० लाखापर्यंत लोन घेता येणार
- कोट्यावधी लोकांचं वीजबिल शून्य करण्याचा प्रयत्न करु
- आयुष्यमान भारत योजनेत ५ लाखापर्यंत लोन मिळेल
- तृतीय पंथीयांना आयुष्यमान भारत योजनेत आणणार
- ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवण्याचा प्रयत्न