कॉल फॉरवर्डिंग सेवा का बंद केली जात आहे?
कॉल फॉरवर्डिंग सेवा म्हणजे एका कोडच्या साहाय्याने एकापेक्षा अनेक नंबरशी आपण जोडले जाऊ शकतो. या फीचरचे फायदे आणि तोटेही आहेत. दोन नंबर असलेले लोक या सेवेचा लाभ घेतात. यामुळे जर ती व्यक्ती नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असेल तर त्या व्यक्तीला दुसऱ्या नंबरवर कॉल रिसिव्ह करता येतो. मात्र, ऑनलाइन फ्रॉड करण्यासाठी स्कॅमर्स *401# USSD कोड वापरतात. याद्वारे अनोळखी व्यक्ती तुम्हाला कॉल करतात आणि *401# डायल करुन अनोळखी नंबरवर कॉल करतात आणि फ्रॉड करतात. जर तुम्ही असा कॉल उचलला तर तुमच्या नंबरवर येणारे कॉल किंवा मेसेज दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे तुमची सर्व माहिती स्कॅमर्सला मिळते.त्यातून फसवणूक होते. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, USSD आधारित कोडच्या मदतीने ऑनलाइन फसवणूक केली जात होती. वास्तविक, ही कोड आधारित सेवा युजर्सच्या सोयीसाठी आणण्यात आली होती. परंतु घोटाळेबाज हा कोड चुकीच्या पद्धतीने वापरत होते आणि फसवणूक करत होते. अशा परिस्थितीत 15 एप्रिल 2024 पासून ही सेवा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
यूएसएसडी कोड म्हणजे काय?
हा *401# सारखा शॉर्ट कोड आहे, या प्रकारच्या कोडच्या मदतीने फोनमधील बॅलेन्स तपासता येतो. तसेच कॉलबॅक सर्व्हिस, पैशांशी संबंधित सेवांची माहिती मिळू शकते. त्याच्या मदतीने आयएमईआय (IMEI) नंबर शोधता येतो. एवढेच नाही तर कॉल फॉरवर्डिंग सेवेच्या मदतीने तुम्ही तुमच्या नंबरवर येणारा कॉल दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर *401# डायल करावे लागेल.