मंगळावर पडेल पहिले मानवी पाऊल
स्पेसडॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार हे रियुजेबल रॉकेट असेल. रॉकेटच्या प्रत्येक प्रक्षेपणाला सुमारे ३ मिलियन डॉलर्स इतका खर्च येईल, २००४ साली प्रक्षेपित करण्यात आलेल्या फाल्कन-१ रॉकेट निर्मिती करण्यातही याप्रमाणे खर्च आला होता. मात्र आता स्टारशिपला यापेक्षा कमी किमतीत अवकाशात पाठवण्याची योजना कंपनीने आखली आहे. तसेच, या रॉकेटच्या माध्यमातून प्रथमच मानवांना मंगळ ग्रहावर पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी मंगळ ग्रहाशी संबंधित मिशन्समध्ये प्रत्यक्ष मानवाचा समावेश नव्हता. या मिशनबद्दल वेळोवेळी ते माध्यमांशी बोलतांना दिसतात.
स्टारशिप या रॉकेटची आतापर्यंत ३ वेळा चाचणी घेण्यात आली आहे. तिन्हीही वेळ या रॉकेटने अपेक्षेप्रमाणे काम केले आहे. रॉकेटची बांधणी पूर्ण झाल्यानंतर अमेरिकन प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यास या मोहिमेला सुरुवात होणार आहे. कंपनीने सध्या आपल्या चांद्र मोहिमेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. या मोहिमेत अंतराळयान लवकरच चंद्रावर अंतराळवीरांसह दाखल होणार आहे.
जगभरात पसरवणार सॅटेलाईट नेटवर्क
इलॉन मस्क नेहमीच काही भन्नाट प्रकल्पांवर काम करतांना दिसतात. स्टारलिंक कंपनीच्या मदतीने मस्क लवकरच आपल्या सॅटेलाईट नेटवर्कचे जाळे जगभरात पोहोचवणार आहेत. इलॉन मास्क लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा हा दौरा सॅटलाईट नेटवर्कच्या उद्दिष्टाने असेल असे सांगण्यात येत आहे. SpaceX व Starlink या दोन्ही कंपन्यांच्या मदतीने इलॉन मस्क सध्या अनेक प्रकल्पांवर काम करीत आहेत. स्टारलिंक परवाना अद्याप डेव्हलपमेंट प्रक्रियेत आहेत. स्टारलिंकचे सुमारे ९२ कोटी इतके ब्रॉडबँड ग्राहक आहेत. सध्या व्होडाफोन-आयडिया, जिओ आणि एअरटेल टेलिकॉम मार्केटमधील आघाडीच्या कंपन्या. आहेत, परंतु एलोन मस्क देखील लवकरच त्यात प्रवेश करू शकतात.