नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मोदी की गॅरंटी या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी, महिला, तरुण आणि वृद्धांवर अधिक भर देण्यात आला आहे. नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. ज्यामध्ये कोट्यवदी लोकांचं वीजबिल शून्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. तसेच, मोफत रेशन योजना ही पुढील पाच वर्षापर्यंत सुरु राहिल अशी घोषणाही मोदींनी केली.
लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या घोषणा –
- मोफत रेशन योजना पुढच्या पाच वर्षांपर्यंत राहील, मोदींची गॅरंटी
- आयुष्यमान भारत योजनेच्या आधारे गरिबांना ही सुविधा मिळत राहील
- आता घराघरापर्यंत पाईपमार्फत स्वस्त गॅस पोहोचवणार
- ७० वर्षांवरील वृद्धांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळेल
- गरिबांचं कल्याण करणाऱ्या अनेक योजनांचा संकल्प
- मुद्रा योजनेमार्फत आता २० लाखापर्यंत लोन घेता येणार
- कोट्यावधी लोकांचं वीजबिल शून्य करण्याचा प्रयत्न करु
- आयुष्यमान भारत योजनेत ५ लाखापर्यंत लोन मिळेल
- तृतीय पंथीयांना आयुष्यमान भारत योजनेत आणणार
- ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवण्याचा प्रयत्न
भ्रष्टाचाऱ्यांवर अशीच कारवाई होत राहील
भारतात स्थिर आणि बहुमताचं सरकार पाहिजे. आम्ही ३७० हटवलं आणि सीएए आणलं. एक देश आणि एक निवडणूक ही संकल्पना घेऊन पुढे जाणार आहोत. भ्रष्टाचारावर भाजपने कडक कारवाई केली आहे. भ्रष्टाचार गरिबांचे आणि मध्यम वर्गीयांचे हक्क मारतो. भ्रष्टाचाऱ्यांवर अशीच कारवाई होत राहील, ही मोदींची गॅरंटी आहे.