मुंबई महापालिकेसाठी भाजपचा मराठी कट्टा; अनिल परबांनी केला ‘हा’ दावा

मुंबईः मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी (BMC Election) भाजपनं जोरदार कंबर कसली आहे. सत्ताधारी शिवसेनेला (shivsena) मात देण्यासाठी भाजपनं (BJP) आत्तापासून तयारी सुरू केली आहे. मुंबईतील मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं मुंबईत मराठी कट्टा सुरू केल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबईतील मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपनं मराठी कट्टा सुरू केला आहे. यावर अनिल परब यांनी भाष्य केलं आहे. ‘प्रत्येकाला निवडणूक जिंकण्यासाठी जे मार्ग अबलंबवायचे आहेत ती त्या पक्षाची मोकळीक असते. मुंबई महापालिका कित्येक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे. आम्ही लोकांच्या समोर आमची कामे घेऊन जाऊ. लोकांचा विश्वास आहे महापालिका शिवसेनेच्या हातात सुरक्षित आहे. भविष्यात पण ते शिवसेनेच्या हातात देतील, असा दावा अनिल परब यांनी केला आहे. तसंच, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही इतके वर्ष मुंबईकरांचा विश्वास जिंकला आहे आणि याच्यापुढेही तो जिंकू’, असं अनिल परब म्हणाले आहेत.

वाचाः २४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी; सोमय्यांची पोलिसांत तक्रार

किरीट सोमय्या बेछूट आरोप करत आहेत

‘गेले काही महिने माझ्यावर किरिट सोम्मया कुठलेही पुरावे नसताना आरोप करत आहेत. याबद्दल मी १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. यात माफी मागण्याचीही मागणी केली आहे. त्यासंदर्भातील पुरावे दिले आहेत. त्यामुळे मला नक्कीच न्याय मिळेल. माझी जी बदनामी झाली ती पुसून टाकायला या याचिकेने मदत होईल. मी कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही. म्हणून मी कोर्टात दाद मागितली आहे,’ असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

सोमय्यांनी कोर्टात येऊन उत्तर द्यावं

‘मी न्यायाधीशाचं काम करत नाही. सोमय्याच न्यायाधीशाचं काम करत आहेत. तेच आरोप करतात आणि निर्णय देतात. मी योग्य प्लॅटफॉर्मवर गेलो आहे. मी कोर्टाकडे दाद मागितली आहे. माझ्यावर झालेला हा अन्याय आहे. त्यासाठी मी कोर्टात आलो आहे. कोर्टात सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच. सोमय्यांनी कोर्टात येऊन उत्तर द्याव,’ असं आव्हान अनिल परब यांनी केलं आहे.

वाचाः ‘रिया चक्रवर्तीकडे २ ग्रॅम हेरॉइन सापडल्यावर भंडावून सोडणारे आता गप्प का?’

किरीट सोमय्यांच्या रडारवर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याच्या चर्चा आहेत, त्यावरही अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सर्व आरोप खोटे आहेत. हे लवकरच सिद्ध होईल. बेछुट आरोप करून प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी घेतलं आहे आणि ते काम ते करत आहेत. मला पूर्ण खात्री आहे आम्ही सर्व यातून आमचं निर्दोषत्व सिद्ध होईल. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.

वाचाः … तर आम्ही कोर्टात जाऊ; देवेंद्र फडणवीसांचा थेट इशारा

Source link

anil parab vs kirit somaiyabjpbmc electionShivsenashivsena vs bjpअनिल परबकिरीट सोमय्या
Comments (0)
Add Comment