‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. न्यायालयीन निर्णयात त्याचा वापर संधी आणि आव्हाने दोन्हीही निर्माण करण्याची शक्यता असल्याने याविषयी बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. आगामी काळात या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भौगोलिक आणि संस्थात्मक सीमा ओलांडून जगभरातील संबंधितांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,’ असेही मत चंद्रचूड यांनी व्यक्त केले.
भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयांमध्ये तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिषदेत ते बोलत होते. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन यांच्यासह अनेक न्यायाधीश आणि तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित होते. ‘कायदेशीर क्षेत्रात, एआयमध्ये कायदेशीर संशोधन आणि विश्लेषण वाढविण्यापासून ते न्यायालयीन कार्यवाहीची कार्यक्षमता सुधारण्यापर्यंत कायदेशीर व्यावसायिकांच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची प्रचंड क्षमता आहे. कायदेशीर संशोधनाच्या क्षेत्रात, एआय गेम-चेंजर म्हणून उदयास आला आहे,’ असेही चंद्रचडू यांनी नमूद केले.
एआयमुळे अनेक अभूतपूर्व संधी निर्माण होत असल्या, तरी त्यामुळे जटिल आव्हानेही उभी राहण्याची शक्यता आहे.- न्या. धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश