Video : राहुल गांधींचा प्रचाराचा झंझावात, अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरची चेकिंग, पोलिसांना काय मिळालं?

नवी दिल्ली : तमिळनाडूमधील नीलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. हे हेलिकॉप्टर राहुल गांधींना घेऊन केरळमधील वायनाडमध्ये निघालं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितलं की, नीलगिरीत उतरल्यानंतर फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. पण तपासात काहीही आढळलं नाही. केरळमधील वायनाडमध्ये ते जात होते. तिथे ते रोड शो आणि सभांसह अनेक निवडणूक प्रचारात सामील होण्यासाठी निघाले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची अशाप्रकारे तपासणी केल्यानंतर विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाडमधून मोठा विजय मिळवला होता. राहुल गांधींचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) ॲनी राजा यांच्याशी होणार आहे, जे विरोधक INDIA गटाचे मित्र आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या केरळ युनिटचे प्रमुख के सुरेंद्रन आहेत. लोकसभेच्या २० जागा असलेल्या केरळमध्ये २६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये ३९ जागांसाठी १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

वायनाड जागेवर काँग्रेसच्या विजयाचा इतिहास

केरळमधील वायनाड लोकसभेची जागा २००८ मध्ये अस्तित्वात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या जागेवर काँग्रेसचं वर्चस्व आहे. यात ७ विधानसभेच्या जागा आहेत. या सातही विधानसभा जागा मनथावाडी, सुल्तानबथेरी, कल्पेट्टा आणि कोझीकोड जिल्ह्यात येतात. २००९ मध्ये या जागेवर काँग्रेसचे एमआय शानवास खासदार म्हणून निवडून आले होते.
उद्धव ठाकरे मर्सिडीज फिरवतात त्यांचा धंदा काय? नारायण राणेंची उद्धव ठाकरेंना विचारणा
वाडनाड जिल्ह्याची लोकसंख्या ८.१८ लाख आहे. ज्यात ४.१ लाख पुरुष आणि ४.१५ लाख महिला आहेत. या जिल्ह्याचा साक्षरता दर ८९.०३ टक्के आहे. वायनाडमध्ये ४९.४८ टक्के हिंदू, २८.६५ टक्के मुस्लिम आणि ख्रश्चिन समुचदाय २१.३४ टक्के आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसकडे पैसा नाही, अडचण सांगत राहुल गांधींचा मोदी, शाहांवर आरोप

वायनाड लोकसभा जागेसाठी २००९ मध्ये पहिल्यांदा संसदीय निवडणुका घेण्यात आल्या. यात काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं. काँग्रेसचे एमआय शानवास यांनी सीपीआयच्या एम रहमतुल्लाह यांचा १,५३,४३९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी शानवास यांना ४,१०,७०३ आणि रहमतुल्लाह यांना २,५७,२६४ मतं मिळाली होती.

Source link

Jitendra AwhadRahul Gandhirahul gandhi helicopter checkedrahul gandhi wayanadजितेंद्र आव्हाडराहुल गांधीराहुल गांधी वायनाडराहुल गांधी वायनाड हेलिकॉप्टर तपासणी
Comments (0)
Add Comment