Jio युजर्ससाठी आनंदाची बातमी! या प्लॅन्ससह मिळेल ७८ GB पर्यंत अतिरिक्त डेटा, १४ OTT ऍप्समध्येही मिळेल ऍक्सेस

Jioने आपल्या युजर्सला आनंदाची बातमी दिली आहे. नुकतेच कंपनीने काही धमाकेदार प्लॅन्स लॉन्च केले आहेत. यात कंपनी कोणत्याही अतिरिक्त चार्जशिवाय ग्राहकांना अधिक डेटा देणार आहे. या प्लॅन्समध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठी काही दर्जेदार OTT ऍप्सचे सब्सक्रिप्शन पूर्णपणे मोफत देण्यात येईल. सोबतच यात अनलिमिटेड व्हॉइस कॉल व मेसेजेसची सुविधा देखील मिळणार आहे.

Jioचा ३९८चा बेस प्लॅन

jio कंपनीचा हा बेस प्लॅन २८ दिवसाच्या व्हॅलीडीती सह मिळेल. यात युजर्सला दररोज २ डेटा मिळणार आहे. शिवाय यात ६GB अतिरिक्त डेटा देखील ऑफर करण्यात येईल. अनलिमिटेड 5जी डेटासह रोज १०० फ्री एसएमएस व अनलिमिटेड मोफत व्हॉइस कॉलिंग मिळेल. यात कंपनी Jioसिनेमा, सोनीLiv व झी५ सह १२ ओटीटी ऍप्सचे फ्री ऍक्सेस देईल.

Jioचा ७४९ रुपयांचा प्लॅन

Jioचा हा मिड लेव्हल प्लॅन ९० दिवसाच्या व्हॅलीडीटी सह मिळेल. यूजरला यात दररोज २GB डेटा मिळणार आहे. अतिरिक्त २०GB डेटासह पात्र युजर्स 5जी अनलिमीटेडचा देखील लाभ घेता येणार आहे. यातही १०० मोफत मेसेजेस व अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. JIO टीव्ही व सिनेमा यांचा फ्री ऍक्सेस मिळणार आहे.
Jioचा ११९८ रुपयांचा प्लॅन

Jioचा ७४९ रुपयांचा प्लॅन

Jioचा हा प्लॅन ८४ दिवसाच्या व्हॅलीडीटी सह मिळेल. यूजरला यात दररोज २GB डेटा मिळणार आहे. अतिरिक्त १४ GB डेटासह पात्र युजर्स 5जी अनलिमीटेडचा देखील लाभ घेता येणार आहे. यातही १०० मोफत मेसेजेस व अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. Jio टीव्ही व सिनेमा यांचा फ्री ऍक्सेस मिळणार आहे. या प्लॅनमध्ये, कंपनीला प्राइम व्हिडिओ मोबाइल, डिस्ने + हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी ५ आणि जिओ सिनेमा प्रीमियमसह १४ ओटीटी ॲप्समध्ये विनामूल्य ऍक्सेस मिळेल.

Jioचा ४४९८ रुपयांचा प्लॅन

Jioचा हा प्लॅन ३६५ दिवसाच्या व्हॅलीडीटी सह मिळेल. यूजरला यात दररोज २GB डेटा मिळणार आहे. अतिरिक्त ७८GB डेटासह इलीजीबल युजर्सला 5जी अनलिमीटेडचा देखील लाभ घेता येणार आहे. यातही १०० मोफत मेसेजेस व अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. Jio टीव्ही व सिनेमा यांचा फ्री ऍक्सेस मिळणार आहे. Jio या प्लॅनच्या वापरकर्त्यांना प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि डिस्ने + हॉटस्टारसह १४OTT ॲप्समध्ये मोफत ऍक्सेस मिळेल.

Source link

data plansextra datajio usersunlimited voice callsजिओ वापरकर्ते
Comments (0)
Add Comment