भयंकर! विहिरीवर पाणी आणायला गेलेल्या ८० वर्षीय महिलेवर अत्याचार

अहमदनगरः शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात नगरजवळील रतडगाव येथे ही घटना घडली होती. नराधम आरोपीने ज्येष्ठ महिलेला गलोरीने दगड मारून खाली पाडले. तिच्यावर अत्याचार केले. तिच्या गुप्तांगाला दुखापत केली होती. जिल्हा न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी या आरोपीला शिक्षा दिली आहे.

नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे त्या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये त्या ज्येष्ठ महिलेला दिलासा म्हणून देण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी दिली.

वाचाः मुंबई महापालिकेसाठी भाजपचा मराठी कट्टा; अनिल परबांनी केला ‘हा’ दावा

नगर तालुक्यातील रतडगाव येथे ८ मार्च २०२० रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. ८० वर्षीय ज्येष्ठ महिला पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. ती पाणी भरत असताना आरोपी नाना चंदु निकम याने गलोरीने महिलेच्या तोंडावर दगड मारला. नंतर तिची मान पिरगळुन तिला खाली पाडले आणि अत्याचार केला. तिच्या गुप्तांगावर नखांनी जखमा केल्या. यावेळी महिला जोरजोरात ओरडत होती. तिचा आवाज ऐकून तिच्या सुना मदतीला धावल्या. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनला आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.

वाचाः २४ तासांत मुंबई पोलिसांनी माफी मागावी; सोमय्यांची पोलिसांत तक्रार

या गुन्ह्याचा तपास फौजदार डी. आर. जारवाल यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे आठ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. ज्येष्ठ महिलेनेही मोठ्या धीराने साक्ष दिली. याशिवाय उपचार करणारे डॉक्टर, घटनास्थळावरील साक्षिदार तिच्या सुना आणि अन्य पंचांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. यातून न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा व अॅड. दिवाणे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी नाना चंदु निकम यास दोषी धरले. त्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात दहा वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, मारहाण केल्याच्या गुन्ह्यात सहा महिने सक्त मजुरी व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली. दंडाच्या रक्कमेपैकी १५ हजार रूपये फिर्यादी महिलेला देण्यात येणार आहेत.

वाचाः ‘रिया चक्रवर्तीकडे २ ग्रॅम हेरॉइन सापडल्यावर भंडावून सोडणारे आता गप्प का?’

Source link

Ahmednagar Crime NewsAhmednagar Crime News in Marathiahmednagar newsअहमदनगरज्येष्ठ महिलेवर अत्याचार
Comments (0)
Add Comment