जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका; संपूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, PM मोदींची घोषणा

उधमपूर (जम्मू-काश्मीर) : ‘जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याचा आणि या प्रदेशाला राज्याचा दर्जा पुन्हा मिळण्याचा काळ आता फार दूर नाही. या केंद्रशासित प्रदेशातील नागरिक लवकरच त्यांच्या समस्या मंत्री आणि आमदारांपर्यंत पोहोचवू शकतील’, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिली. उधमपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, हल्ले, दगडफेक आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराची भीती न बाळगता यंदाची लोकसभा निवडणूक होणार आहे. गेल्या तीन दशकांत फुटीरतावाद्यांनी चालवलेल्या ‘मतदान बहिष्कार’ मोहिमा आता इतिहासजमा झाल्या आहेत’, असे मोदी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या प्रदीर्घ दु:खाचा अंत करण्याचे आश्वासन आपण पूर्ण केल्याचे सांगत, राज्यघटनेतील कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आव्हान मोदी यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना दिले.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विकासप्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा बदलला आहे. येथील नागरिक निराशेकडून आशेकडे वळले आहेत, हा सर्वांत मोठा बदल असल्याचे मोदी म्हणाले.

विरोधकांवर चौफर हल्ला करणारी सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत

‘राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही’

अयोध्येतील राम मंदिर हा भाजपसाठी निवडणूक मुद्दा असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान मोदी यांनी जोरदार हल्ला चढवला. ‘राम मंदिर हा कधीही निवडणुकीचा मुद्दा नव्हता आणि कधी राहणारही नाही. ही देशातील नागरिकांच्या श्रद्धेची बाब आहे’, असे पंतप्रधान म्हणाले.

Source link

article 370Civilian Issues in Jammu and KashmirJammu and Kashmir Assembly Electionslok sabha elections 2024Narendra Modipm modi in udhampurpm modi rallyRam Mandir Issueजम्मू आणि कश्मीर विधानसभा निवडणूकपंतप्रधान मोदीची घोषणा
Comments (0)
Add Comment