अनेकदा लोक घरच्या घरी पाणी टाकतात पण पूर्ण माहिती नसल्यामुळे ही बॅटरी खराब होते. बॅटरीची किंमत खूप जास्त असल्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होते. इन्व्हर्टरच्या बॅटरीत जास्त पाणी टाकल्यामुळे ही बॅटरी खराब होत असते. यामुळे आज आपण इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकण्याचचे योग्य प्रमाण काय असते ते जाणून घ्या. योग्य मापाने पाणी टाकल्यास वर्षानूवर्षे तुमचा इन्व्हर्टर चांगल्या स्थितीत राहील.
इन्व्हर्टर बॅटरीमधील पाण्याचे योग्य प्रमाण जाणून घेण्यासाठी विविध प्रोडक्ट्सची सर्वप्रथम माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. सामान्यपणे इन्व्हर्टर बॅटरीमधील पाण्याची पातळी खालील प्रकारे तपासली जाऊ शकते :
या बॅटरीची मर्यादा आणि चिन्हे कंपनीनुसार वेगळे असू शकतात. साधारण कोणत्याही इन्व्हर्टर मधील पाण्याची पातळी खालील एककांद्वारे मोजली जाऊ शकते.
- इंडिकेटर लाइन्स व मार्कर्स – तुम्हाला बॅटरीच्या समोर किंवा वरती एक इंडिकेटर लाइन किंवा मार्कर दिसेल जे तुम्हाला किती पाणी भरायला हवे ते सांगेल. हे मार्कर्स तुम्हाला बॅटरीच्या बाजूला बघायला मिळतील.
- डिस्टिल्ड किंवा डिमिनरलाइज्ड पाणी: बॅटरी भरण्यासाठी डिस्टिल्ड किंवा डिमिनरलाइज्ड पाण्याचा वापर करणे गरजेचे असते.
- मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा: बॅटरीच्या कंपनीद्वारे देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करा. यात तुम्हाला बरीचशी उपयुक्त माहिती मिळेल.
- स्विंगिंग हायड्रोमीटरचा वापर: स्विंगिंग हायड्रोमीटर बॅटरी ॲसिड पातळीचे प्रमाण मोजण्यात मदत करू शकते, ज्यामुळे तुम्हाला बॅटरीमध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकता येईल.
बॅटरीमधील पाण्याचे योग्य प्रमाण ओळखून, पाणी टाकल्यास तुमच्या इन्व्हर्टर बॅटरीची लाईफ वाढेल व ते जास्त दिवस टिकेल.