देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान १८५३मध्ये धावली, या ऐतिहासिक घटनेला १७१ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. या पावणेदोन शतकांमध्ये भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारले आहे. ‘वंदे भारत’ ही रेल्वेजाळ्याच्या आधुनिकीकरणाची नवीन ओळख ठरली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले.
वंदे भारतला प्रारंभ
१५ फेब्रुवारी २०१९
दिल्ली ते वाराणसीदरम्यान दोन ट्रेन
सद्यस्थितीत
ट्रेनची संख्या १०२
मार्गांची संख्या १००
जोडलेले जिल्हे २८४
जोडलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश २४
वंदे भारत रेल्वेगाड्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात पार केलेले अंतर
पृथ्वीभोवती ३१० प्रदक्षिणांच्या बरोबरीचे
वंदे भारत रेल्वेगाड्यांची वैशिष्ट्ये
– जागतिक दर्जाच्या सुविधा
– डिस्ट्रिब्युटेड-पॉवर तंत्रज्ञानामुळे वेग चटकनव वाढवणे व कमी करणे शक्य
– वेग, आरामदायी आसने, साउंडप्रूफ डबे
– वायफाय सेवा, जीपीएस आधारित प्रवासी माहिती यंत्रणा, – प्रत्येक डब्यात पँट्री
– मोठ्या आकाराच्या पारदर्शक खिडक्यांमुळे निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची सुविधा
स्लीपर रेल्वेही लवकरच
आणखी काही वंदे भारत रेल्वे सेवेत दाखल होणार असून वंदे भारतची स्लीपर आवृत्तीही लवकरच रुळांवर धावणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुलभ होण्याची आशा आहे.