सर्वात स्वस्त iPhone मध्ये मिळेल मोठा डिस्प्ले; अँड्रॉइडच्या किंमतीत मिळेल शानदार कॅमेरा

Apple एका नवीन परंतु ओळखीच्या डिजाइन आणि अनेक चांगल्या बदलांसह, वर्ष २०२५ च्या सुरुवातीला iPhone SE 4 सादर करण्याची तयारी करत आहे. अशी चर्चा आहे की हा नवीन बजेट फ्रेंडली iPhone बटनलेस मॉडर्न डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो. तसेच यात मोठी स्क्रीन आणि सुधारित कॅमेरा दिला जाईल, अशी माहिती Nguyen Phi Hung यांनी दिली आहे.

डिस्प्ले मिळेल मोठा

लीकनुसार, iPhone SE 4 मध्ये जुन्या मॉडेल प्रमाणे Touch ID च्या जागी एक नॉच असेल. अशी चर्चा आहे की डिजाइन iPhone 13 सारखी असेल, ज्यात शायद फेस आयडीचा समावेश केला जाईल. मागच्या बाजूची डिजाइन iPhone Xr सारखी असू शकते, ज्यात एक कॅमेऱ्याचा समावेश असेल. हा बदल केल्यामुळे फोनमध्ये फेस आयडीची सुविधा मिळेल. २०२२ मध्ये आलेल्या iPhone SE च्या ४.७ इंचाच्या स्क्रीन पेक्षा मोठा डिस्प्ले आगामी मॉडेलमध्ये मिळेल, रिपोर्टनुसार ६.१ इंचाची स्क्रीन असू शकते. लीकनुसार, iPhone SE 4 ची फ्रेम १४८.५ x ७१.२ x ७.८ मिलीमीटर असेल आणि फोनचे वजन सुमारे १६६ ग्राम असेल.

मिळू शकते नवीन चिप

iPhone SE 4 मध्ये वेगवान चिपसेट दिली जाऊ शकते, कदाचित यात Apple A16 चा समावेश केला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी Snapdragon X70 मॉडेम आणि Apple U1 UWB चिप देखील असू शकते. जोडीला 6GB RAM आणि १२८ जीबी ते ५१२जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.3 आणि USB-C कनेक्टरचा समावेश केला जाऊ शकतो.

बॅटरी बाबत वेगवेगळी माहिती येत आहे. काहींच्या मते याची क्षमता ३००० एमएएचच्या आसपास असू शकते, तसेच काहींनी ३२७९ एमएएचचा दावा केला आहे. तसेच iPhone SE 4 मध्ये २० वॉट वायर्ड चार्जिंग आणि १२ वॉट वायरलेस चार्जिंग मिळू शकते, यात MagSafe चा सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.

लीक झालेल्या माहितीमध्ये आधी एकापेक्षा जास्त कॅमेऱ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु आता वाटत आहे की यात फक्त एकच कॅमेरा असेल. एक्सपर्टनुसार, हा कॅमेरा 48MP IMX503 सेन्सर असेल जो २०२२ च्या iPhone SE च्या १२एमपीच्या कॅमेऱ्यापेक्षा जबरदस्त असेल.

Source link

appleiPhoneiphone seiphone se 4आयफोनआयफोन एसई ४
Comments (0)
Add Comment