नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. देशातील प्रशासकीय, पोलिस आणि परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसह अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय सेवेसाठी होणाऱ्या या सर्वात कठीण परिक्षेत आदित्य श्रीवास्तव हा देशात प्रथम आला आहे.
युपीएससीने वेबसाईटवर (https://upsc.gov.in/) हा निकाल जाहीर केला आहे. पहिल्या १०० जणांमध्ये महाराष्ट्रातील अनिकेत हिरडे ८१व्या स्थानावर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये १ हजार १४३ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली होती. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखत झाली होती. त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर झाले.
UPSC परीक्षेतील रँकमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी
अनिकेत हिरडे- ८१वे रँक
अर्चित डोंगरे- १५३वे रँक
प्रियांका सुरेश मोहिते- ५९५वे रँक