एरंडोल येथे प्रभाग क्रमांक ५मध्ये स्वच्छता मोहीमेस प्रारंभ..


(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल:येथे नगरपालिकेतर्फे दर बुधवारपासून आठवडा भर एका प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.२२सप्टें रोजी प्रभाग क्रमांक ५मध्ये नगरसेवक डॉ. सुरेश पाटील व नगरसेवीका जयश्री पाटील यांच्या हस्ते स्वच्छता मोहीमेची सूरूवात करण्यात आली.
ब्राम्हण ओटा, मारवाडी गल्ली, भगवा चौक, पाटील वाडा या प्रमुख भागांसह संपूर्ण परीसरात गटारी, रस्ते,खुल्या जागेत साफसफाई व फवारणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्याधिकारी विकास नवाळे, हितेश जोगी, अनिल महाजन, विनोद पाटील,आनंद दाभाडे व इतर कर्मचारी मोहीमेच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत.

Comments (0)
Add Comment