Redmi Pad SE इंडिया लाँच डेट
Xiaomi नं कंफर्म केलं आहे की येत्या २३ एप्रिलला भारतात Redmi Pad SE सादर केला जाईल. हा टॅबलेट ब्रँडच्या Xiaomi Smarter Living 2024 इव्हेंटमध्ये एंट्री करेल, त्याचबरोबर TWS इअरबड, हेयर ड्रायर आणि रोबोट व्हॅक्युम क्लीनर देखील सादर होऊ शकतो.
वेबसाइटवर Redmi Pad SE टॅबलेटचे तीन कलर आणि काही स्पेक्स दिसत आहेत. हा टॅबलेट काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात १७,००० रुपयांमध्ये सादर झाला होता, यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की भारतात याची किंमत १५ किंवा २० हजार या रेंजमध्ये ठेवली जाऊ शकते.
Redmi Pad SE चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Pad SE च्या मायक्रोसाइटच्या माध्यमातून हा कंफर्म झालं आहे की यात TUV रीनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह ११ इंचाचा डिस्प्ले मिळेल. यात ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, डॉल्बी एटमॉसला सपोर्टसह क्वॉड स्पिकर दिले जातील.
ब्रँडनं कंफर्म केला आहे की नवीन रेडमी टॅबलेट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८० चिपसेटसह येईल. शाओमीनं स्टोरेज ऑप्शनची माहिती दिली नाही, परंतु आशा आहे की यात ४जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेजची सुविधा दिली जाऊ शकते.
वेबसाइटवर जी माहिती दिसली आहे त्यावरून समजलं आहे की Redmi Pad SE मध्ये ४३ दिवसांपर्यंतचची बॅटरी लाइफ मिळेल. विशेष म्हणजे ग्लोबल व्हेरिएंटमध्ये १०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह ८,०००एमएएचची बॅटरी आहे. ही बॅटरी भारतात देखील येऊ शकते.