Dry Ice AC म्हणजे काय आणि तो कसे काम करतो
ड्राय आईस एअर कंडीश्नर पद्धतीने कुलिंगचे काम करतो. यात ड्राय आईसचा (स्थायू कार्बन डाइऑक्साइड) वापर करून गारवा निर्माण केला जातो. मात्र थेट ड्राय आईसचा वापर करणे हानिकारक ठरते. कारण जाणून घ्या
अतिशय थंड पदार्थ (-78.5°C) – ड्राय आईस थेट त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरासाठी हानिकारक ठरतो तसेच, यातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साइड गॅस हा प्लास्टिक व रबराच्या भागाला हानी पोहोचवतो यासाठी यात पाण्याचा देखील वापर करणे गरजेचे असते. ड्राय आइस हाताळतांना नेहमी हातमोज्यांचा वापर करा
डिझाइन कसे आहे
ड्राय आइस एअर कंडीश्नरर खरं तर कोरड्या बर्फामुळेच थंडावा देतो. हे आकाराने लहान आहे आणि त्याचा आकार बॉक्सी स्वरूपाचा आहे. या आत एक कंपार्टमेंट दिले आहे ज्यामध्ये ड्राय आईस भरण्यात येतो. ड्राय आईस आणि पाणी भरल्यानंतर आणि पंख्याच्या मदतीने त्याची थंड हवा बाहेर येते.
ड्राय आईसचा वापर एअर कंडिशनरमध्ये देखील कसा केला जाऊ शकतो
१. कूलर बॉक्समध्ये ठेवा
ड्राय आईस कूलरच्या बॉक्समध्ये ठेवा. एअर कंडिशनरमधून हवा या बॉक्समधून बाहेर जाते. ड्राय आईस असल्यामुळे ही हवा थंड होऊन बाहेर पडेल
२. पाणी अधिक थंड करण्यासाठी
पाणी अधिक थंड करण्यासाठी ड्राय आईसचा वापर केला जाऊ शकतो.
तसेच, ड्राय आयसच्या जागी, आपण एअर कंडिशनर अधिक उत्तम प्रकारे चालवण्यासाठी इतर पद्धती वापरू शकता जसे की, एअर फिल्टर्स नियमितपणे बदला. उष्णतेपासून खोलीचा बचाव करा. एअर कंडिशनर व्हेंट्स स्वच्छ ठेवा.