एबीपी आणि सीवोटरने केलेल्या या सर्वेमध्ये देशभरातील ५४३ मतदारसंघामध्ये ११ मार्च ते १२ एप्रील या दरम्यान जवळपास ५७ हजार ५६६ मतदारांची मतं जाणून घेण्यात आली होती. त्यांच्याकडून जनता कोणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्यात आले.
तामिळनाडूमध्ये एनडीएला झटका तर इंडिया आघाडीला फायदा
तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला फायदा होताना दिसत आहे. इथल्या सर्व ३९ जागांवर सर्वे करण्यात आला असून त्यामध्ये एनडीएची मतांची टक्केवारी वाढताना दिसत आहे. पण जागा जिंकण्यात ही टक्केवारी कमी पडताना दिसत आहे.
मिळणारी मतांची टक्केवारी खालील प्रमाणे
इंडिया आघाडी – ५२%
एनडीए -१९%
एआयडीएमके-२३ %
इतर- ६%
या सर्वेमध्ये सर्वच्या सर्व ३९ जागा इंडिया आघाडीकडे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मतांची टक्केवारी वाढलेली असली तरी बीजेपीला एकही जागा मिळताना दिसत नाही. एकंदरीत तामिळी जनतेने या राज्यात इंडिया आघाडीवर विश्वास दाखवल्याचं चित्र दिसत आहे.
हरियाणामध्ये पुन्हा एनडीए वर्चस्व?
शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेलं राज्य हरियाणा. गेल्या ५ वर्षात हरियाणामधून अनेक मोठी शेतकरी आंदोलने झाली. शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. पण या असंतोषाचा फायदा इंडिया आघाडीला मिळताना दिसत नाही. कारण एबीपी सी वोटरच्या सर्वेमध्ये हरियाणामध्ये भाजपला सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. तर एकत्रित निवडणूक लढवत असलेल्या कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाची मात्र निराशा होताना दिसत आहे.
मिळणारी मतांची टक्केवारी खालील प्रमाणे
एनडीए- ५३%
इंडिया आघाडी- ३८ %
आईएनएलडी – २%
इतर – ७%
या मतांच्या टक्केवारी नुसार भाजप ९ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडी १ जागा जिंकण्याची शक्यता आहे. पण सर्वेमध्ये हरियाणा मधील लढती अटीतटीच्या असतील, असे सांगण्यात आलंय. ३% मते जर पलटली तर निकाल वेगळा लागण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पंजाबमध्ये इंडियाचा फायदा एनडीए, अकाली दलाचा तोटा
शेतकऱ्यांचा सरकारवर असलेला रोष हरियाणामध्ये दिसत नसला तरी तो पंजाबमध्ये मात्र दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेसला फायदा होताना दिसत आहे. तर भाजपला आणि अकाली दलाला तोटा होताना दिसत आहे. पंजाबमध्ये आपला ४ जागा तर कॉंग्रेसला ७ आणि भाजपला २ जागा मिळण्याची शक्यता आहे, असा सी वोटरचा सर्वे आहे. या वेळेस भाजप आणि अकाली दल वेगळे लढत असल्याने त्याचा तोटा भाजपला होताना दिसत आहे.
छत्तीसगडमध्ये इंडियाला जोरदार झटका
एबीपी न्यूज आणि सीवोटरच्या सर्वेनुसार भाजपला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
मतांची टक्केवारी खालील प्रमाणे
एनडीए- ५०%
इंडिया – ४४%
इतर – ६%
मध्यप्रदेशमध्ये मोदींचं वारं
एबीपी न्यूज आणि सीवोटरच्या सर्वेनुसार मध्यप्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस पार्टीला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
मतांची टक्केवारी खालील प्रमाणे
एनडीए- ५३%
इंडिया – ४३%
इतर – ४%
या सर्वेनुसार मध्यप्रदेशमध्ये मोदींचंच वारं वाहत असल्याचं दिसत आहे.
दिल्लीकरांचा मोदींवरच विश्वास
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीकरांचा सुद्धा मोदींवरच विश्वास असल्याचे एबीपी न्यूज आणि सीवोटरच्या सर्वेमधून दिसत आहे. दिल्लीमध्ये सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टी जिंकत असल्याचं सर्वेमधून सांगण्यात येत आहे.
बिहारमध्ये मोदी आणि नितीश यांची जादू
बिहारमध्ये सुद्धा मध्ये एनडीएला ३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडियाला ७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
मतांची टक्केवारी खालील प्रमाणे
एनडीए- ५१%
इंडिया – ४०%
इतर – ९%
तर आपल्या सभांमधून गर्दी खेचणाऱ्या तेजस्वी यादव यांना मतांमध्ये गर्दीचा फायदा होत नसल्याचे या सर्वेमधून दिसत आहे.