धक्कादायक! १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई

हायलाइट्स:

  • १८ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू
  • वडिलांनी केली होती मारहाण
  • पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू

औरंगाबाद : टाकळीवाडी येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. राधा कैलास जारवाल असं मृत मुलीचं नाव आहे. राधा हिला तिच्या वडिलांनी मारहाण केली होती. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी संशयाचे धुकेही निर्माण झालं आहे.

राधा जारवाल हिच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनीच तिचा मृतदेह पुरल्याची चर्चा गावात सुरू झाल्यानंतर या घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास दौलताबाद पोलीस करत आहेत. सदर घटना २० सप्टेंबरच्या रात्री घडली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

रेखा जरे हत्या प्रकरण; ‘या’ वर्तनामुळे बाळ बोठेला मिळाला नाही जामीन!

नेमकं काय घडलं?

या प्रकरणात दौलताबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा जारवाल ही टाकळीवाडी इथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. २० सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान स्वयंपाक करत असताना, तिच्या आईने वडील कैलास जारवाल यांना राधा माझ्याशी भांडली असल्याचं सांगितलं. त्यामुळे रागावलेल्या कैलास जारवाल याने एक लाकूड आणून राधाला मारहाण केली. या मारहाणीनंतर राधाने मनात राग धरून शेतात असलेल्या विहिरीत उडी घेतली. कैलास हे राधाला शोधण्यासाठी गेले असता, राधा विहिरीत आढळली. कैलास जारवाल यांनी व अन्य दोन जणांनी राधाला विहिरीतून बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत तिने प्राण सोडले होते.

राधाच्या मृत्यूनंतर वडिलांनी गुपचूप तिचा अंत्यविधी उरकल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, कैलास जारवाल यांनी या घटनेची माहिती त्यांच्या मुलांना व पत्नीलाही दिलेली नव्हती. १८ वर्षीय मुलीच्या मृत्यूची गावात चर्चा सुरू झाल्यानंतर पोलीस पाटील उदयसिंग जारवाल यांनी कुटुंबाला बोलावून घेत, या घटनेची माहिती दौलताबाद पोलिसांना दिली. हा प्रकार समजताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे, सहायक पोलीस निरीक्षक आर बी राठोड, उपनिरीक्षक रवी कदम, पोलीस अंमलदार सुदर्शन राजपूत, व्ही एस खंडागळे हे घटना स्थळी पोहोचले. मृत मुलीचे प्रेत २३ सप्टेंबरला बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांनी दिली.

Source link

Aurangabad crime newsmurder caseआत्महत्याऔरंगाबादऔरंगाबाद पोलीसहत्या प्रकरण
Comments (0)
Add Comment